नाशिक

सोळा कोटी खड्ड्यात; नाशिककरांचा प्रवास खडतरच !

खड्ड्यांचा प्रश्न ‘जैसे थे’! दोन हजार खड्ड्यांची मलमपट्टी बाकी

नाशिक : प्रतिनिधी
मे महिन्या अवकाळी पावसाने दिलेली जोरदार हजेरी व त्यानंतर जूनमध्ये टप्प्याटप्प्याने होणार्‍या मुसळ्धार पावसाने शहरातील रस्ते उखडून टाकले आहेत. परिणामी शहरातील रस्त्यांवा पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले असून, बांधकाम विभाग नागरिकांच्या टीकेचा धनी बनला आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत 7,283 खड्डे बुजविले असून, अद्याप 1,935 खड्ड्यांची मलमपट्टी बाकी असल्याचे चित्र आहे. बांधकाम विभागाने आतापर्यंत खड्ड्यांवर सोळा कोटींची उधळण करूनही खड्ड्यांचा प्रश्न
नाशिककरांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे मनपाकडे खड्ड्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 4,500 खड्डे बुजविण्यात आले असून 2,297 खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली. सहाही विभागात एकूण 6,797 खड्डे आहेत.सिडको, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम विभाग, नाशिकरोड, पंचवटीसह नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले. त्यामुळे या रस्त्यातून प्रवास करतांना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रकारही घडले आहेत.
कॉलनी रस्ते, मुख्य रस्त्यांवरील डांबरीकरण व सिमेंट रस्त्यांचेही नुकसान झाले. शहरातील खड्डे दुरुस्तीसाठी कोटयावधीची तरतूद अंदाजपत्रकात केली जाते. महापालिका दरवर्षी या तरतुदीतील निधीचा उपयोग रस्तेदुरुस्तीवर करत असते. मात्र, पावसाळ्यात दर्जाहीन कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य शहरभर दिसून येते. पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम शक्य नसल्याने माती मुरुम टाकून मलमपट्टी केली जाते. परंतु काही दिवसातच खड्ड्यांतून माती, मुरुम वाहून जाऊन खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा जैसे थे होत असल्याचे दिसून येते. सध्या शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशा मागण्या मनपाकडे येत आहेत. त्या पाश्वभूमीवर मनपाकडून विविध भागातील रस्तेकाम सुरू करण्यात आले आहे.

विभागवार खड्ड्यांची माहिती
विभाग                         बुजविलेली संख्या               अपूर्ण खड्डे
नाशिक पूर्व                            20                                47
नाशिक पश्चिम                     65                                54
पंचवटी                                 4270                           235
नाशिकरोड                           996                              148
सातपूर                               115                                  273
सिडको                               1817                              1178
एकूण                                 7283                            1935

 

खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असून गेल्या महिन्यात पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामे राहिली होती. मात्र तरीही सहाही विभागात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. लवकरच ती पूर्ण केली जातील. अभियंत्यांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

11 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

11 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

11 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

12 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

12 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

12 hours ago