महाराष्ट्र

लोहगडप्रकरणी सियाची गुन्ह्याची कबुली

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना (रिक्रिएट) केली. हत्येची आरोपी बनलेली केतन अग्रवालची प्रेयसी सिया गोयल हिला पोलीस सोबत घेऊन आले होते. यावेळी सिया गोयलला तिने केतनची हत्या का केली, असा प्रश्न विचारण्यात आला. सियाने गुन्ह्याची कबुली दिली असून, संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
पोलीस आता सोमवारी सिया गोयलला न्यायालयात हजर करणार आहेत. सिया गोयलची पोलीस कोठडी 29 जून रोजी संपत आहे. न्यायालयाने तिला एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. सिया तपासात सहकार्य करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना करताना तिने संपूर्ण घटनेबद्दल माहिती दिली. केतन मर्डर केस सियाने संपूर्ण सीक्वेन्सचा खुलासा केला.लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना करण्यासाठी, पोलिसांनी मृत केतन अग्रवालच्या वजनाइतकाच एक डमी तयार केला. त्यानंतर पोलिसांनी, ज्या ठिकाणी केतन पडून मरण पावला, त्या ठिकाणी संपूर्ण घटनेची पुनर्रचना केली आणि त्याच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पुरावे गोळा केले. पोलिसांचा दावा आहे की, लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरून पडून केतन अग्रवालचा 18 जून रोजी मृत्यू झाला. गोयल आणि चौधरी यांनी त्याला मारण्याचा कट रचला होता, कारण गोयलला अग्रवालसोबतचे तिचे नोव्हेंबरमधील लग्न करायचे नव्हते.
सियाने ढकलण्याचा संकेत कसा दिला?
सियाच्या म्हणण्यानुसार, या योजनेत लोहगड किल्ल्याच्या शिखरावर जाऊन बुटांच्या लेस बांधण्याचे नाटक करायचे होते. सिया लेस बांधण्यासाठी खाली वाकताच, चेतन मागून केतनवर हल्ला करणार होता. योजनेनुसार, चेतनने अचानक केतनला मागून धक्का दिला, ज्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात केतनचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सियाच्या कबुलीजबाबाचे आणि संपूर्ण घटनेच्या पुनर्रचनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे, जे न्यायालयात ठोस पुरावा म्हणून सादर केले जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सियाने केतनची हत्या का केली?
तपास अधिकार्‍यांच्या मते, चौकशीदरम्यान गोयलने कबूल केले की, तिला आपल्या कुटुंबाला निराश करायचे नसल्यामुळे केतन अग्रवालसोबतचे ठरवलेले लग्न रद्द करण्याऐवजी ते संपवणे सोपे वाटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांच्या भूमिकेबद्दल तपासात पोलिसांना संशय आला. त्यातून मग पुढे कबुली समोर आली आहे. कटाचा उलगडा करण्यासाठी तपास पथक सियाच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहे आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहे. पोलीस आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या जीवनातील विविध पैलूंची चौकशी करत आहेत.

Siya confesses to the crime in the Lohagad case.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago