मोहदरी घाटात छोटा हत्ती टेम्पो पेटला

सिन्नरकडे गाद्या घेऊन येत असताना घडली घटना

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक- पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात गाद्या घेऊन जाणारा छोटा हत्ती टेम्पोला अचानक आग लागून पेटल्याची घटना सोमवारी (दि.6) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. नाशिक रोड येथून सिन्नरकडे गाद्या घेऊन येत असताना मोहदरी घाटात गणपती मंदिराजवळ टेम्पोने अचानक पेट घेतला.
या आगीत सुमारे 30 हजार रुपये किमतीच्या गाद्या जळून खाक झाल्या. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने त्याचा जीव वाचला. जाकीर गणी पिंजारी यांचा विहीतगाव येथे गादी बनवण्याचा कारखाना आहे. दुपारी ते स्वतः छोटा हत्ती टेम्पो (एमएच 02 / एआर 6963) मधून सुमारे 47 गाद्या घेऊन सिन्नर येथे डिलिव्हरी करण्यासाठी येत होते. मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ चालक सीटच्या खालून अचानक धूर येऊ लागल्याने त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवत सीट बाजूला घेतले. यावेळी आगीचा भडका उडाला. त्यांनी सोबत असलेल्या पाण्याच्या ड्रम मधील पाणी शिंपडण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग आणखीनच भडकली. रस्त्याने जाणार्‍या अनेक वाहनधारकांनी थांबून त्यांच्या जवळील पाणी शिंपडले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण टेम्पो कवेत घेतला. टेम्पोच्या पाठीमागच्या बाजूने 12 ते 15 गाद्या काढण्यात यश आले. मात्र उर्वरित सुमारे 30 हजार रुपयांच्या गाद्या आगीत खाक झाल्या. माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी
आग विझवली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *