खड्ड्यांभोवती रांगोळी काढून मनपाचा निषेध

वडाळागाव : प्रतिनिधी
नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असताना, आम आदमी पार्टीकडून अभिनव पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. राजीव गांधी भवन व रामायण बंगला परिसरातील रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांभोवती रांगोळी काढून मनपाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यात आला.
यावेळी देवाभाऊ चला, नाशिकच्या रस्त्यांचे खड्डे पाहू, या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात व जीवितहानी होत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे. ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला. खड्डे बुजवले गेले नाहीत, तर आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, अमोल लांडगे, मंजूषा जगताप, माजिद पठाण, संजय कातकडे, गोरख मोहिते,सलीम तांबोळी, देवराम जाधव उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था वारंवार लक्षात आणून देऊनही मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे निषेधाच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनातून नागरिकांच्या वेदना अधोरेखित करण्यात आले आहे.
– अमोल लांडगे, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *