जबाबदार कोण ?
नाशिक:
शहरात दीर्घ प्रतिक्षे नंतर मान्सुनचा पहिला पाऊस झाला .पहिल्या पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला. मात्र पहिल्याच पावसात शहरात सराफ बाजार ,दहीपुल, हुंडीवाला लेन ,भद्रकाली या परिसरात प्रचंड पाणी साचल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक, व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या पाण्याने गटारीतले,नाततले पाणी तुंबुन रस्त्यावर आले. त्यामुळे महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याची साफसफाई केली नसल्याचे उघड झाले. पहिल्याच पावसात नाशिक तुंबल्याचे चित्र होते त्यामुळे नाशिकची पहिल्याच पावसात झालेल्या अवस्थेला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
वीज गायब
पावसाच्या संतधारेनंतर शहरात विजेचा लंपडाव सुरू झाल्याने महावितरणवरण ही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
स्मार्ट सिटीची दुर्दशा
शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या अर्धवट स्वरूपातील कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यातून वाट काढणेही कठीण होऊन बसले होते.
हा पाहा व्हिडिओ: