राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेत एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे यश

राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेत एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे यश

नाशिक |  प्रतिनिधी

नाशिक येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या प्रथमवर्ष एमबीबीएस विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या सौरभ सरगर याने संशोधन प्रकल्प सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस (UCMS) दिल्ली आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजचे संशोधन विभाग (MICE LAB) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सौरभच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार, १२ वेगवेगळ्या विषयांवर देशभरातील बहु-विद्याशाखीय विद्यार्थ्याना नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी सांघिक प्रवेशिका सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून ११ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.

नाशिक येथील एसएम बी टी मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस प्रथमवर्षातील विद्यार्थी सौरभ सरगर आणि त्याच्या संघाने सादर केलेल्या “एन्टेरिक म्युको अढेजीव्ह कोटेड कॅप्सुल” या थ्रीडी ऍनिमेटेड प्रकल्प सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.

प्रतिदिवस प्रमाणे ठराविक दिवसांसाठी योग्य वेळेत घ्यावी लागणारी औषधांची मात्रा एकच कॅप्सूल घेऊन मिळवता येऊ शकते, त्यासाठी रोज ठराविक वेळेत औषध घेण्याची गरज भासणार नाही ही संकल्पना या संशोधनातून मांडण्यात आली. या संशोधनासाठी सौरभ आणि त्याच्या संघाच्या सादरीकरणाने घवघवीत यश मिळवले.

सौरभच्या मेडिकल कॉलेजमधील प्रथम वर्षातच नाविन्यपूर्ण संशोधन कल्पनेचे आणि अपार मेहनतीचे एसएमबीटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी कौतुक केले. तसेच सौरभच्या संशोधनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

7 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

7 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

7 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

8 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

8 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

8 hours ago