सोनाली कुलकर्णीने सासरी तयार केला गोड पदार्थ

सोनालीने एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. सोनालीने लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी स्वयंपाक केला. सोनालीने सासरच्या मंडळींसाठी जो गोड पदार्थ तयार केला त्याच्यासोबतचा फोटो तिने शेअर केला आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून सासरचा एक फोटो शेअर केला आहे.
सोनालीने सासरी पहिल्यांदाच स्वयंपाक तयार केला. तिने आपल्या सासरच्या मंडळींसाठी खास पदार्थ तयार केला. या पदार्थासोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोनालीने सासरी पहिलाच गोड पदार्थ तयार केला तो म्हणजे तांदळाची खीर. सोनालीने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत असे म्हणते की, सासरी केलेला पहिला पदार्थ, ‘तांदळाची खीर’ या कॅप्शनसोबत सोनालीने सुंदर उखाणा देखील लिहिला आहेत. ‘लग्नविधीनंतर घातलेल्या मंगळसूत्राच्या उलट्या वाट्या, कुणालच्या घरच्यांसाठी आणल्या तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या’ असा उखाणा तिने या फोटोसोबत लिहिला आहे.
या फोटोमध्ये तांदळाच्या खीरीने भरलेल्या वाट्या ताटामध्ये दिसत आहेत. हे ताट हातामध्ये घेऊन सोनालीने फोटो काढला आहे. सोनालीने तयार केलेली खीर खूपच छान दिसत आहे. या फोटोत सोनालीने कुर्ता घातला असून, कपाळाला कुंकू, गळ्यात लांब मंगळसूत्र घातल्याचे दिसत आहे.
एखाद्या गृहिणीप्रमाणे सोनालीचा लूक दिसत आहे. सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. दरम्यान, सध्या सोनाली तिच्या सासरी म्हणजेच लंडनला आहे. लग्नानंतर सोनाली आपल्या सासरच्या मंडळींसोबत पहिल्यांदा खूपच एन्जॉय करत आहे. हा प्रत्येक क्षण ती आपल्या चाहत्यांसोबत फोटोच्या माध्यमातून शेअर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *