सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेस लासलगाव पोलिसांनी केले जेरबंद

लासलगाव प्रतिनिधी

प्रकाशा ता शहादा जिल्हा नंदुरबार येथुन व्यापाऱ्यास भुरळ घालुन सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेस लासलगाव पोलीसांनी अटक केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी दिली

अश्विन बाळकृष्ण सोनार रा प्रकाशा शहादा जि नंदुरबार यांचे फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार येथे भादवि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अश्या घडणाऱ्या गुन्हांना प्रतिबंध करण्यासाठी सचिन पाटील,पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण,माधुरी केदार – कांगणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व समरसिंग साळवे उप विभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग मनमाड अतिरीक्त चार्ज,उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हददीत दररोज गस्तसाठी साध्या वेशात पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे .

वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हयाचे तपासी अधिकारी राजन मोरे सहा पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाणे यांनी व्हॉटसअप / सोशलमिडीयावर संशयित महिलांचे फोटो व्हायरल केले होते सदर फोटोच्या माहितीच्या आधारे संजयनगर,लासलगाव येथील महिला सरला कापसे वय ३० वर्षे हिची तिच्या राहत्याघरी महिला अमंलदार सोनाली शिंदे यांनी अंग झडती घेतली असता तिच्या ताब्यात सोन्याच्या धातुच्या पोत,मनी,मंगळसुत्र मिळुन आल्याने सदर सोन्याच्या वस्तुबाबत तिच्याकडे विचारपुस केली असता तिने उडवा उडवीचे उत्तरे दिली तेव्हा सदर महिलसे पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन तिच्याकडे सखाले चौकशी केली असता तिने मीना कापसे,रामदास शिंदे यांचे सोबत परिणीता ज्वेलर्स,प्रकाशा,ता शहादा जिल्हा नदुरबार येथून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे .

या महिलेकडुन अंदाजे ९०००० रु किमंतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.सदर कामगिरी सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे,पोहवा कैलास महाजन,पोना संजय देशमुख,उषा आहेर पोकॉ प्रदिप आजगे,सोनाली शिंदे,माया वाघ यांचे पथकाने सदर कामगिरी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *