नाशिक

सोयाबीनने ओलांडला हमीभावाचा टप्पा

पाच हजार 380 रुपये प्रतिक्विंटल दर

लासलगाव ः समीर पठाण
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या बाजारभावाने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. सोयाबीनचा शासकीय खरेदीचा हमीभाव 5,328 रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, येथील बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 5,380 रुपये तर सरासरी 5,320 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून निराशाजनक असलेल्या सोयाबीनच्या दरात आता सुधारणा होताना दिसत असल्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रक्रिया प्लांट्सचे दरदेखील आता हमीभावाच्या पातळीवर आले आहेत तसेच खुल्या बाजारातसुद्धा शेतकर्‍यांना चांगला दर मिळू लागला आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन पेंड आणि सोयाबीन तेलाची मागणी वाढल्याने ऑइल मिल्स आणि प्रक्रिया प्लांटनीदेखील खरेदीचे दर वाढवले आहेत. काही ठिकाणी शेतकर्‍यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठा केल्यामुळे बाजारातील आवक काहीशी घटली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवर
होत आहे.

उत्पादनातील घटीमुळे बाजारभावात वाढ

यावर्षी भाव वाढण्यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे ‘उत्पादनातील घट’. सोपाने जरी देशात 105 लाख टन उत्पादनाचा अंदाज वर्तवला असला, तरी बाजारातील अभ्यासकांच्या मते यंदा सोयाबीनचे उत्पादन 90 ते 95 लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावले आहे. उत्पादन कमी आणि बाजारातील आवक मंदावल्यामुळे दरांना आधार मिळत आहे.

सोयापेंड निर्यातीचे गणित

सोयाबीनचे दर प्रामुख्याने सोयापेंड आणि तेलाच्या दरावर अवलंबून असतात. यावर्षी आतापर्यंत पाच लाख टन सोयापेंडची निर्यात झाली आहे, जी गेल्या वर्षी इतकीच आहे. युरोप, नेपाळ आणि बांगलादेशमधून भारतीय नॉन-जीएम सोयापेंडला चांगली मागणी आहे. जरी यावर्षी एकूण निर्यात कमी होण्याचा अंदाज असला, तरी मुळात उत्पादनच कमी झाल्यामुळे निर्यातीचा आकडा कमी झाला तरी त्याचा दरावर विपरीत परिणाम होणार नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago