नाशिक

सातपूरच्या प्रभाग सभेत सभापती देवरे आक्रमक

अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा; तक्रारींचा पाऊस

नाशिक : प्रतिनिधी
प्रभाग सभेला यापुढे येताना अधिकार्‍यांनी संपूर्ण माहिती घेऊनच हजर रहावे, लोकप्रतिनिधी प्रश्न विचारतात आणि अधिकारी मला माहिती नाही, असे उत्तरे देतात. यामुळे सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे हे कमालीचे संतप्त झाले. यापुढे माहिती नाही. असे उत्तर अधिकार्‍यांनी दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराच देवरे यांनी दिला.
सातपूर प्रभाग समितीची बैठक काल सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांबाबत अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सातपूर भागातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयांची दुरुस्ती तातडीने केली जात नसल्यामुळे आतापर्यंत या भागात दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत या भागातील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. अनेक भागात घंटागाडी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कचरा टाकताना अडचणी येतात. धुर फवारणी देखील वेळेवर होत नाही. अशोक नगर भागात बारदान फाटा ते त्र्यंबक लिंक रोड या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. ते काढण्याबाबत अधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी यावेळी नगरसेवकांनी केल्या.
टास्क फोर्सने नेमके काय काम केले? किती समस्या सोडवल्या? याची विचारणा नगरसेवकांनी यावेळी प्रभाग सभेत केली. सविता काळे यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांवर तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. उपस्थित नगरसेवक यांनी प्रभागातील खड्डे,पाणी कचरा समस्या बाबतीत प्रश्न विचारले. यावेळी नगरसेवक, नितीन निगळ, नगरसेविका इंदुबाई नागरे उषाताई बेंडकुळी, हर्षदा गायकर ,सोनाली भंदुरे,मानसी शेवरे, सविता काळे, संगीता घोटेकर नयना जाधव, भारती देवरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर यांनी प्रभागातील खड्डे, ड्रेनेज समस्या दूषित पाणीपुरवठा डासांची समस्या, धूर फवारणी, अनियमित घंटागाडी इतर समस्या मांडत त्वरित कारवाई करण्याची मागणी सभापती देवरे यांच्याकडे करत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती
प्रभाग सभेला उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांवर उपस्थित नगरसेवकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. घंटागाडी वेळेवर येत नाही, धुर फवारणी होत नाही. अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासह इतर अनेक समस्या मांडण्यात आल्या. विशेषत: रस्त्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच खड्डयांवरून नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

Speaker Deore aggressive in Satpur ward meeting

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago