नाशिक

खडड्ड्यांवरुन वातावरण तापले

ठाकरे सेनेचे मनपात आंदोलन

♦ सहा तास प्रतीक्षा करुनही महापौरांची भेट नाही
♦ आंदोलनाची धास्ती घेतल्याचा सेनेचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी
नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, शहराची दुर्दशा करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, उत्तर द्या, उत्तर द्या महापौर उत्तर द्या. या प्रशासनाचे करायचे काय? खाली डोके वर पाय. अशी घोषणाबाजी करत शिवसेना ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि.30) महापालिकेत आंदोलन केले. ठाकरेंच्या नगरसेवकांनी सकाळी साडे अकरा वाजता महापौरांचे दालन गाठले. मात्र सायंकाळचे साडेपाच वाजूनही महापौर हिमगौरी आहेर-आडके न आल्याने सहा तासानंतर नगरसेवकांनी पालिकेतून काढता पाय घेतला.
गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचा घोषणाबाजी करुन निषेध केला. शहरातील रस्त्यांच्या विदारक परिस्थितीमुळे दररोज अपघात होत आहेत. बुधवारी (दि.29) पुन्हा अंबड परिसरात खड्डा चुकविताना नीलेश कोतकर या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सततच्या दुर्घटनेमुळे रस्त्यावरून वाहने चालविताना नागारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, ठाकरे सेनेने गुरुवारी आक्रमक होत महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केले. महापौरांनी 17 जुलै रोजी महासभा घेण्याचे निर्देश महासभेत देऊनही विशेष महासभा लांबविण्याचे कारण काय? असा सवाल नगरसेवकांनी केला. नागरिकांच्या जिवाची नव्हे ठेकेदाराचे हित गरजेचे असल्याचा गंभीर आरोप यावेळी लगावण्यात आला. सेनेच्या नगरसेवकांनी प्रारंभी महापलिकेच्या पायर्‍यावर बसत आंदोलन केले. तेथून महापौरांचे कार्यालय गाठले. महापौर रस्ते पाहणी करत असल्याने कार्यालयातच ठिय्या साडे अकरा ते चारपर्यंत ठाकरे सेनेचे नगरसेवक महापौर कार्यालयात बसून होते. यावेळी नगरसेवक योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, मंगला आढाव, सीमा पवार, प्रथमेश गिते, मुरलीधर भामरे, शैलेश ढगे, योगेश भोर, रुचिरा साळ्वे, वैशाली दाणी आदीसह सेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

खड्डेबळींचे फोटो महापौर दालनात
आतापर्यंत शहरातील विविध भागात खड्डयांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो ठाकरे गटाने सोबत आणत ते महापौरांच्या दालनातील खुर्चीवर ठेवले. प्रशासनाचा निषेध केला. तसेच प्रशासन अजून किती जणांचा बळी घेणार? असा आरोपही प्रभाकर निकम, प्रवीण गायकवाड, दीपाली बेळे, नीलेश कोतर यांचे फोटो घेऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

धास्तीमुळे कोणीही फिरकले नाही
महापौरांची सहा तास वाट पाहून देखील त्यांनी आम्हाला भेट देणे टाळले. विशेषत: आंदोलनाच्या धास्तीने महापौर, उपमहापौर, आयुक्त, शहर अभियंता कोणीही महापालिकेत दिवसभर नव्हते. मात्र तुम्ही अजून किती जणांचे बळी घेणार आहात. शहराची कधी नव्हे अशी भयाण स्थिती झाली आहे. महापौरांनी आमच्यासमोर येऊन आमच्या काय मागण्या आहेत. काय म्हणणे आहेत. ते तरी जाणून घेणे आवश्यक होते. त्यांनी अधिकार्‍यांना पाठीशी घालणे बंद करावे.
– केशव पोरजे, गटनेते, उबाठा

उबाठाने राजकारण करू नये
शहरात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, महापौर, उपमहापौरांसमवेत आम्ही संपूर्ण शहरात पाहणी केली. उबाठाने त्यांच्या प्रभागातील कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या सर्वाचे भांडवल विनाकारण उबाठाने भांडवल करुन राजकारण करु नये, तसेच कामात हलगर्जी करणार्‍यांना सोडणार नाही.
– मच्छिंद्र सानप, स्थायी सभापती, मनपा

The atmosphere heated up from the pits

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago