एसएमबीटी-पोलीस विभागात विशेष करार

कुटुंबीयांना मिळणार कॅशलेस उपचार

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एसएमबीटी हॉस्पिटल व ‘महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना’अंतर्गत विशेष करार करण्यात आला आहे. या करारामुळे आता पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पूर्णपणे कॅशलेस अर्थात कुठल्याही प्रकारे पैसे न भरता उपलब्ध होणार आहेत.
या योजनेंतर्गत एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये 50 हून अधिक गंभीर आणि आपत्कालीन आजारांवर कॅशलेस उपचारांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, वॉल्व्ह रिपेअर, वॉल्व्ह रिप्लेसमेंट यांसारखे हृदयरोगविषयक उपचार तसेच कर्करोग (कॅन्सर), मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट), बीएमटी म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय रस्ता अपघात, तीव्र मेंदूविकार, पक्षाघात, तीव्र उदर वेदना, (अ‍ॅक्युट अ‍ॅबडोमिनल पेन) जळीत आणि विषबाधा यांसारख्या आपत्कालीन प्रसंगी तातडीचे मोफत उपचार मिळणार आहेत. तसेच कान-नाक-घसा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र इमर्जन्सी, डोळ्यांचे विकार आणि लहान मुलांच्या जन्मजात विसंगतीवरील तातडीच्या शस्त्रक्रियादेखील या योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. सीटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे, मॅमोग्राफी आणि पूर्णपणे संगणकीकृत पॅथॉलॉजी लॅबसह 24 तास आपत्कालीन अपघात विभाग, सुसज्ज रुग्णवाहिका व ब्लड बँक यांसारख्या अद्ययावत सोयीसुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. या कॅशलेस सुविधेमुळे पोलीस कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाच्या चिंतेपासून मोठा दिलासा
मिळाला आहे.

पोलीस बांधवांच्या सेवेसाठी हॉस्पिटलची हेल्पलाइन
एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने पोलीस बांधवांच्या सोयीसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. या ठिकाणी 24 तास या हेल्पलाइनच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांसाठी सल्ला व मार्गदर्शन मिळणार आहे. पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलच्या वतीने
86051 70170 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या सामाजिक भावनेतूनच एसएमबीटी हॉस्पिटलने ‘महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजने’अंतर्गत हा विशेष करार केला आहे. पोलिसांना कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय तत्पर आणि सर्वोत्तम कॅशलेस वैद्यकीय सेवा देण्यास आमचे प्रशासन कटिबद्ध आहे.
– सचिन बोरसे, संचालक, रुग्णसेवा एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

Special agreement between SMBT and the Police Department

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *