सिन्नर शहरात विकासकामांचा धडाका; 1.96 कोटीची कामे मार्गी

रस्ते, गटारी, जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरणासह सभामंडप व संरक्षक भिंतींच्या कामांचे आज भूमिपूजन-लोकार्पण

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील विविध भागांतील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सुमारे 1 कोटी 96 लाख 23 हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण गुरुवारी (दि. 24) करण्यात येणार आहे. नागरी दलितेत्तर वस्ती विकास योजनेतून रस्ते, गटारी, जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभीकरणाची कामे, तर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडप, रस्ता व संरक्षक भिंतींची कामे केली जाणार आहेत.
सायंकाळी 4 वाजता होणार्‍या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांच्या हस्ते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमास नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपाध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते मनोज देशमुख, सागर भाटजिरे, विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत.
1.11 कोटीची नागरी कामे
नागरी दलितेत्तर वस्ती विकास योजनेंतर्गत 1 कोटी 11 लाख 27 हजार रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यात व्यापारी बँक ते चांडक बंगला रस्त्याचे बंदिस्त गटारीसह काँक्रिटीकरण (27.83 लाख), गंगावेस ते बाजारवेस रस्ता मजबुतीकरण (11.19 लाख), यशवंतनगरातील ओपन स्पेसमध्ये वॉल कंपाउंडसह जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण (40 लाख) यांचा समावेश आहे. याशिवाय, यशवंतनगरमधील पंकज बनकर ते साउली संकुल रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी 17.05 लाख, तर डॉ. नीरजकुमार त्रिपाठी ते रविराज ढोरे घरापर्यंत बंदिस्त गटारीसह रस्ता काँक्रिटीकरणासाठी 15.19 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

21 लाखांचे आयुष्मान आरोग्य मंदिर

दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून 21 लाख रुपये खर्चाचे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या केंद्रात प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची तपासणी, सामान्य बाह्यरुग्ण सेवा, मानसिक आरोग्य, दंत व मुखरोग, वृद्धांसाठी आरोग्य सेवा, प्राथमिक व आपत्कालीन उपचार तसेच आयुष व योग सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

खासदार निधीतून 63.95 लाखांची कामे

खासदार स्थानिक विकास निधीतून महानुभव मंदिराजवळ सरस्वती नदीस संरक्षक भिंत (9.80 लाख), छत्रपती शिवाजी महाराजनगर व संजीवनीनगर येथे प्रत्येकी 14.65 लाखांचे सभामंडप तसेच सचिन खर्जे ते सिद्धी संकुल रस्त्याचे काँक्रिटीकरण व बंदिस्त गटारासाठी 24.84 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.

Spree of development works in Sinnar city; projects worth ₹1.96 crore set in motion.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *