विभागीय कार्यालयातील स्थिती; नाकाला रुमाल लावून जेवणाची वेळ
नाशिक ः प्रतिनिधी
एन.डी पटेल रोड येथील एस.टीच्या विभागीय कार्यालयात प्रवेश करणार असेल तर नाकाला रुमाल लावणे गरजेचे आहे. कारण या कार्यालयात प्रवेश करता क्षणी जवळच असलेल्या स्वच्छता गृहातून येणार्या दुर्गंधीमुळे मळमळायला होते.अभ्यागत कसे तरी आपले काम उरकून निघून जातात. परंतु आठ तास अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करणे किती अवघडल्यागत होतेय याचा अनुभव सद्या येथील कर्मचारी घेत आहेत.
एस.टीच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता गेल्या काही महिन्यांपासून झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर एस.टी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी कामावर परतल्याने सर्व कामकाज पूर्वपदावर येत आहे.कार्यालयात महिला पुरूष कर्मचारी स्वच्छतागृहाचा वापर करतात.परंतु अत्यंत दुर्गधी आणि अस्वच्छता असल्याने स्वच्छतागृहांचा वापर टाळावा लागत असल्याने महिला कर्मचार्यांची कुचंबणा होत आहे. आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.कार्यालयात जेवणाच्या वेळी नाकावर रुमाल लावून जेवण करावे लागत असल्याचे अनेक कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. वारंवार वरिष्ठांकडे निवेदन,तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत विभाग नियंत्रकांना विचारले असता त्यंानी बडतर्ङ्ग केलेले कर्मचारी असल्याने टप्याटप्याने कामावर येत असल्याचे सांगितले. शंभर टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. स्वच्छता कर्मचारीही हजर होत आहे. लवकरच स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एस.टी कर्मचार्यांचा विलिनीकरणाच्या मुद्यासाठी संप सुरू होता. अनेक वादविवादानंतर न्यायालयाने कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यातील कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहेत.एस.टीचे कामकाज,ङ्गेर्या पूर्वपदावर येत असल्याने एन.डी पटेल रोडवरील कार्यालय परिसर कर्मचार्यांनी गजबजून गेला आहे. मात्र कार्यालयात पाऊल ठेवताक्षणी दुर्गधीने नाकास रुमाल लावून आत प्रवेश करावा लागत असल्याचे चित्र आहे.याबाबत विचारणा केली असता अनेकदा तक्रार,निवेदन देवूनही स्वच्छता होत नसल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जाते आहे. केवळ एन.डी.पटेल रोड येथील कार्यालयच नाही तर अनेक खासगी किंवा सरकारी कार्यालयांमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे. कर्मचार्यांना काम करतांना स्वच्छ आणि आरोग्याच्या दृष्टीने पूरक असे वातावरणात काम चांगले होते.त्रासदायक आणि अपुर्या स्वच्छतेमुळे कामकाजावरही परिणाम होत असल्याचे अनेक कर्मचार्यांनी सांगितले.
कर्मचारी कामावर टप्याटप्याने हजर होत आहे.लवकरच स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येईल.
मुकुंद कुंवर
विभाग नियंत्रक