महाराष्ट्र

परीक्षा आणि तयारी

आयुष्यावर बोलू काही

राखी खटोड

“काजल, उठ पटकन परीक्षा आहे ना तुझी… अभ्यास नाही का करायचा तुला?”….. सकाळी- सकाळीच आईचा आवाज काजलच्या पानावर पडला आणि ती चटकन उठून बसली. कारण परीक्षा होती ना ! उठायला उशीर झाला… आता अभ्यास कसा होणार? या काळजीने अजून धडकी भरली. पटापट सगळं आटोपून ती अभ्यासाला बसली. पण उशीर झालाय खूप, अभ्यास करायचा बाकी आहे… या भीतीमुळे जे वाचत होती; तेही तिच्या लक्षात राहीना… आई तरी समजावत होती ,’जाऊदे टेन्शन नको घेऊस ..येईल तुला उत्तर लिहिता…’ तेव्हा कुठे काजलची भीती थोडी कमी झाली.
आत्ता बारावीच्या परीक्षा तर सुरू आहेतच, लवकरच दहावीच्या पण बोर्डाच्या परीक्षा सुरू होतील… परीक्षेला बसणारी सर्व मुले परीक्षेसाठी तयार आहेत का? हा कदाचित त्यांच्या आई-वडिलांना पडलेला प्रश्न! आणि मुलांच्या मनातले प्रश्न म्हणजे -कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करू, कसा करू की ,जेणेकरून मला परीक्षेच्या वेळेस टेन्शन येणार नाही…
झालं ‘परीक्षा’ या शब्दाने काहीजण तर पहिलीच खचून जातात. कारण होईल सगळं व्यवस्थित, प्रयत्न तर करून बघूया… असा विचार बहुतेक ते करत नसावेत.,.
खरंतर परीक्षेला एवढं घाबरून जायलाच नको हवं … दैनंदिन जीवनामध्ये आपण किती तरी परीक्षा देतच असतो, मग ती व्यक्ती कोणीही असो. विद्यार्थ्यालाच परीक्षा द्यायला लागते असं नाही…. प्रत्येकाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेला तोंड द्यावच लागतं. पण त्यावेळी स्वतःवरचा विश्वास, मनाची तयारी असणं फार आवश्यक आहे.
प्रथमता एका स्त्रीच उदाहरण घेऊया… स्री ला प्रत्येक रूपामध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात… दिवसेगणीक किती परीक्षा द्याव्या लागतात. किती चतुराईने मार्ग काढून त्या परीक्षेचा सामना करायला लागतो आणि जिद्दीच्या बळावर सफलही व्हावं लागतं. जर ती स्त्री खचली मग ती कोणत्या रूपात का असेना,आई असो की मावशी , आज्जी असो की बहीण, बायको असो की मैत्रीण… तर ती तिच्या बरोबर असणाऱ्याला कशी साथ देणार?
पुरुषही या परीक्षेतून वाचले नाहीत. दैनंदिन जीवनामध्ये संसारात किंवा बाहेरच्या जगात वावरताना प्रत्येक नात्याला जपताना जबाबदारी पार पाडताना त्यांची ही पदोपदी परीक्षा होतच असते.
आत्मविश्वासाने प्रत्येक परीक्षा देणे, त्यात पास होणे आणि पुढच्या परीक्षेला तयार असणे, असं प्रत्येकाला राहायलाच लागतं.
आज मुलांना परीक्षेच्या नावाने भीती वाटते .काही जण प्रश्नपत्रिका हातात आली की घाबरून जातात, गोंधळून जातात. मग त्यांना उत्तर आठवत नाही, जे पाठ केले ते पण विसरायला होतं आणि या गोंधळा पायी जे येत असतं ते पण ते लिहीत नाहीत . आणि विशेष म्हणजे नैराश्य येतं हे नवीनच ऐकायला मिळते…. ते पण विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अवघड गेली म्हणून नैराश्य आलं. खरंच हे खूप विचित्र आहे… विद्यार्थ्यांनी निराश न होता ,खचून न जाता आपल्या प्रयत्नांना थांबवू नये. प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर शांततेने वाचून त्या मधल्या प्रश्नांची उत्तरे मनामध्ये तयार करून अगदी आत्मविश्वासाने ते उत्तर पत्रिकेत मांडायला हवं भीती हा शब्दच खूप लांब ठेवावा म्हणजे त्यामुळे जे विसरायला होतं, जो गोंधळ होतोय तो होणार नाही.
मान्य आहे की आजच्या या धावत्या युगामध्ये सगळीकडेच स्पर्धा आहे ,परीक्षा आहे पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही त्या स्पर्धेचा, परीक्षेचा बाऊ करावा, भीती बाळगावी किंवा खचून जावं. त्या उलट या स्पर्धा, या परीक्षा एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने प्रयत्न चालू ठेवले तर नक्कीच कुठल्याही परीक्षेत पास होणे , यश मिळवणं अशक्य नाही.
विद्यार्थ्यांसाठी…विशेष करून जे आत्ता बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी…. परीक्षेकडे भीतीने बघू नका, आव्हान स्वीकारा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा, काहीही गोंधळ होणार नाही, सर्व प्रश्न सुटतीलच….!

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

5 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

5 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

5 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

5 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

5 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

5 hours ago