नाशिक

सप्तशृंगगडावर 1,408 किलो मिठाईचा साठा नष्ट

‘एफडीए’ची धडक कारवाई; 13 आस्थापनांची तपासणी

सप्तशृंगगड : वार्ताहर
नवरात्रोत्सवात अन्नपदार्थ विक्री आणि प्रसादाची विक्री करणार्‍या स्टॉलसाठीही परवाना आवश्यक केल्यानंतर दुसर्‍या दिवशी, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यात खाद्यपदार्थ व प्रसाद विक्री करणार्‍या 13 आस्थापनांची तपासणी केली व संशयास्पद वाटलेल्या 18 पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात
घेण्यात आले.
असुरक्षित वातावरणात वाहतूक व साठा केलेला तसेच कोणत्याही उत्पादनाची तारीख, ठिकाण, मुदत याबाबतची कोणतीही लेबेल न लावता विक्रीसाठी ठेवलेला 1,408 किलो पामतेलयुक्त मावासदृश मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला. त्याची किंमत 5 लाख 62 हजार 90 रुपये आहे. गडावरील भोजन व खाद्यपदार्थ विक्रेते, मिठाई विक्रेते, पेढा-प्रसाद विक्री केंद्र आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि हाताळणी या सर्व निकषांवर ही तपासणी करण्यात आली. सहआयुक्त मंगेश माने, परिमंडळ 4 चे सहायक आयुक्त संदीप देवरे, अधिकारी एस. जी. मंडलिक, एस. एस. तोरणे, चेतन परदेशी, प्रतीक भड, सोनल पाडळे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, गर्दीत मुदतबाह्य आणि उत्पादन, घटक पदार्थाबाबत काहीही माहिती नसलेला प्रसाद विकण्यात येतो, ज्यामुळे विषबाधेची शक्यता लक्षात घेऊन संशयास्पद साठा जप्त करण्यात आला. भाविकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. आरोग्याशी तडजोड करणारे, घातक रसायने वापरलेले पदार्थ वापरून तयार केलेले पदार्थ विकले जाऊ नयेत, यासाठी उचललेले हे पाऊल योग्य असल्याचे मत बहुसंख्य भाविकांनी व्यक्त केले. भाविकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी एफडीएने खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी घेण्याचे आवाहन केले होते, ज्याच्या कठोर अंमलबजावणीचे संकेत या कारवाईतून देण्यात
आले आहेत.

Stock of 1,408 kg of sweets destroyed at Saptashrunggad.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago