देवळाली कॅम्पमधील कोयता हल्ला प्रकरणाचा उलगडा, शिर्डीतून दोघांना अटक
सिडको/दे.कॅम्प : प्रतिनिधी
जुन्या वादातून एका तरुणाला कोयता आणि फायटरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शिर्डीतून अटक केली. संपत शंकर वायकर (वय 23) आणि तुषार ऊर्फ बोक्या सुनील कोकणे (वय 22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना देवळाली कॅम्प परिसरातील जुनी स्टेशनवाडी येथील स्मशानभूमीजवळ
घडली होती.
फिर्यादी मित्रांसोबत पेट्रोल भरण्यासाठी गेले असताना संपत वायकर आणि तुषार कोकणे हे मोटारसायकलवरून तेथे आले. जुन्या वादावर तोडगा काढण्याच्या बहाण्याने त्यांनी फिर्यादीला स्टेशनवाडी येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे प्रेम थोरात याच्यासोबत का राहतो, या कारणावरून वाद घालत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी फायटर आणि धारदार कोयत्याने फिर्यादीच्या छातीवर, पाठीवर तसेच हातापायांवर वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीचे चित्रीकरणही करण्यात आले. तसेच, आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि पोलीस अंमलदार मनोज शिंदे यांना आरोपी शिर्डीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी तसेच पोलीस अंमलदार मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजिरे यांचे पथक शिर्डीला रवाना झाले.
पथकाने शिर्डीतील भाजी बाजार परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी जुन्या भांडणाच्या वादातून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपींना नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार मनोज शिंदे, संतोष सुपेकर व जितेंद्र वजिरे
यांनी केली.
Deolali Camp sickle attack case solved; two arrested from Shirdi.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…