प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
पंचवटी : प्रतिनिधी
नवीन शिधापत्रिकाधारकांची होणारी आर्थिक लूट थांबवा, याबाबत जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
नवीन शिधापत्रिका तयार करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे सीएससी सेंटरद्वारे पब्लिक लॉगिन वरून कागदपत्रे अपलोड करावे लागतात. या सर्व प्रक्रियेला साधारण 500 ते 1000 रुपये आकारले जातात.शिधापत्रिकाधारक हा सर्वसामान्य कुटुंबप्रमुख म्हणून आपली भूमिका पार पडत असतो. अशा परिस्थितीत नवीन शिधापत्रिकाधारकास पब्लिक लॉगिन वरून नंबर दिला जातो. अपलोड केलेले सर्व कागदपत्रे पुरवठा शाखेकडे संबंधित पुरवठा विभागातील क्लार्क, पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून तपासले जातात. त्यानंतर कमी-अधिक तपासून ते मंजूर करतात. काही त्रुटी असल्यास बाद करतात. बाद झाल्यानंतर ते प्रकरण शिधापत्रिकाधारकास कुठलीही पूर्वसूचना न देता टाइम आउट केले जाते. त्यानंतर अपलोड केलेले प्रकरण हे कायमस्वरूपी बाद होते.पुन्हा नव्याने शिधापत्रिकाधारकास सीएससी सेंटरला जाऊन पब्लिक लॉगिनवरून कागदपत्रे पुन्हा साधारण पाचशे ते हजार रुपये देऊन अपलोड करावे लागतात. याबाबत संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली असता, “आमच्या कामाची हीच पद्धत आहे“ असे उत्तर मिळते.या सर्व परिस्थितीचा शिधापत्रिकाधारकावर होणारा खर्च हा प्रहार जनशक्ती पक्षास मान्य नाही.
नवीन शिधापत्रिकाधारकाची होणारी “आर्थिक लूट“ ही तत्काळ थांबवावी आणि आलेल्या प्रकरणांची योग्य ती शहानिशा करून त्यातील त्रुटी संबंधित शिधापत्रिकाधारकास कळवून त्यानंतर पुढील योग्य ती उचित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आमच्या निवेदनाचा विचार न केल्यास अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष अमजद पठाण उपस्थित होते.
Stop looting of new ration card holders
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…