नाशिक

खडकाळी-आयटीआय, सिव्हिल हॉस्पिटल ते मेळा बसस्थानक रस्त्यांवर वाहतूक बदल

रस्ता काँक्रीटीकरणामुळे तीन महिने टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल ते आयटीआय सिग्नल तसेच सिव्हिल हॉस्पिटल ते मेळा बसस्थानक या प्रमुख मार्गांवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) नाशिक शहर यांनी अधिसूचना जारी केली आहे.
नाशिक महानगरपालिकेमार्फत सबजेल रोड, खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल आणि त्र्यंबकनाका ते आयटीआय सिग्नल या रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने एका बाजूने काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान संबंधित रस्त्यांच्या डाव्या बाजूवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवून उजव्या बाजूने ये-जा सुरू ठेवण्यात येणार आहे.
अधिसूचनेनुसार खडकाळी सिग्नल ते अण्णा भाऊ साठे चौक, अण्णा भाऊ साठे चौक ते त्र्यंबक नाका, त्र्यंबक नाका ते आयटीआय सिग्नल तसेच सिव्हिल हॉस्पिटल ते मेळा बसस्थानक या मार्गांवर विविध टप्प्यांत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहेत.
या काळात वाहतूक शालिमार चौक, सीबीएस चौक, सारडा सर्कल, टिळकवाडी सिग्नल, राणे डेअरीमार्गे वळविण्यात येणार आहे. रस्ताकाम सुरू असताना संबंधित ठेकेदारांनी योग्य प्रकारे बेरिकेडिंग करणे, दिशादर्शक फलक, डायव्हर्जन बोर्ड, सावकाश जा, नो पार्किंग अशा सूचना फलकांची व्यवस्था करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमणे बंधनकारक राहणार आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. 11 फेब्रुवारी 2026 पासून ते दि. 11 मे 2026 पर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शववाहिका तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेच्या वाहनांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर मोटार वाहन अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Traffic changes on Khadkali-ITI, Civil Hospital to Mela Bus Stand roads

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago