महाराष्ट्र

स्टुडंट्स एल्बो कारणे लक्षणे उपाय

डॉ संजय धुर्जड

एल्बो, अर्थात कोपर्‍याच्या सांध्याची आणखी एक व्याधीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याला ‘स्टुडंट्स एल्बो’ असे म्हणतात. या व्याधीची कल्पना तुम्ही करू शकता, कारण याच्या नावातच सर्वकाही आहे. स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आढळून येणारी ही व्याधी कधी उत्पन्न होते, कारणे काय आहेत, लक्षणे काय असतात, उपाय काय आहेत आणि ही व्याधी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याची तपशीलवार माहिती आज आपण घेणार आहोत.

राज्यात इंधन स्वस्ताई

तुम्ही जरी आज विद्यार्थी नसाल तरी आपल्याला ही व्याधी होऊ शकते आणि आपल्या पाल्यांनाही होऊ शकते. म्हणून ही माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या लोकांना फॉरवर्ड करा.
लिहिताना आणि वाचताना आपण आपले हात बाकावर टेकवतो. त्यावेळी आपला कोपर्‍याचा सांधा देखील बाकावर टेकलेला असतो. घर्षण झाले तर कोपर्‍याच्या मागील हाडाला सूज येते. यालाच स्टुडंट्स एल्बो असे म्हणतात. कुठलेही हाड अथवा सांधा त्वचेच्या अगदीच जवळ असल्याचा, त्या हाडाच्या घर्षणामुळे त्वचेला इजा होऊ नये आणि तेथील त्वचा हाडापासून वेगळी रहावी यासाठी त्वचा व हाड / सांधा या दोन्हींच्या मध्ये एक पाण्याची पिशवी असते. याला बरसा (र्इीीीर) असे म्हणतात. अशा भागावर अतिरिक्त घर्षण / दाब येतो तेव्हा या पिशवीला सूज निर्माण होते व त्यातील पाण्याचे प्रमाण वाढते. तो भाग सुपरी/छोट्या लिंबाप्रमाणे दिसतो.

सिडकोत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघड

सूज वाढल्याने वेदना होतात व तो भाग विचित्र दिसतो. अशा वेळी कोपर्‍याच्या मागील हाडावर वजन देण्याचे टाळले किंवा आपला कोपरा टणक पृष्ठभागावर टेकवणे टाळल्यास ती सूज कमी होऊ शकते. फक्त विद्यार्थ्यांनाच या व्याधीची लागण होते असे नाही. टेबल, खुर्चीवर बसून कोपर्‍याचा सांधा टेबलावर टेकवून आपण कुठलेही काम करत असाल तरी हीच प्रक्रिया घडून तुम्हाला स्टुडंट्स एल्बो होऊ शकतो.
याच व्याधीला माईनर्स एल्बोसुद्धा म्हणतात, कारण खाणीमध्ये काम करणार्‍या कामगाराला कोपर्‍याच्या आधारे रांगत जावे लागते. यामुळे कोपर्‍याचा सांधा घर्षणामुळे सुजतो. याचप्रमाणे सेनेतील जवानांनाही अशाच प्रकारची कृती करावी लागते. बरसा सुजला की त्याला बरसायटीस असे म्हणतात आणि कोपर्‍याच्या या हाडाला ओलेक्रेनॉन असे म्हणतात. याच्या व्यतिरिक इतर करणांमुळेही या ठिकाणी सूज येऊन वेदना होऊ शकतात. कारणे वेगवेगळी असली तरी उपाय एकच.

शहरात पावसाची संततधार

वेदनाशामक औषधे, सूज कमी करण्याची औषधे दिली जातात. बर्‍याचदा गोळ्या-औषधांनी सूज कमी होते व रुग्णास बरे वाटते. परंतु, लक्षणे जास्त दिवसांपासूनचे असेल तर औषधांना प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी, इंजेक्शनचा सहाय्याने पिशवीतील पाणी काढले जाते व त्यावर घट्ट पट्टी (कॉम्प्रेशन बँडेज) केली जाते. काही रुग्णांमध्ये पुन्हा पुन्हा पाणी जमा होण्याची शक्यता असते. अशा वेळी इंजेक्शनच्या सहाय्याने पाणी काढून पुन्हा त्याच इंजेक्शनमधून स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जाते. स्टिरॉइडमुळे सूज कमी होण्यास मदत होते व पुन्हा पाणी जमा होणे बंद होते. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्यास या पाण्यात जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होण्याची शक्यता असते. वारंवार पाणी साठणे, जंतुसंसर्ग होणे असे होत असल्यास ऑपरेशन करून ती पिशवी (बरसा) काढली जाते व तो आजार पुन्हा होत नाही. इतर सर्व उपाय बेअसर झाल्यास ऑपरेशन करणे, हा शेवटचा पर्याय अवलंबवावा लागतो.

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

20 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

21 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

21 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

21 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

21 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

21 hours ago