नाशिक

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश

मनपाच्या शिक्षण विभागाचे नियोजन

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचे ठरवत त्यांचा पहिलाच दिवस गोड करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून शिक्षण विभागाने तयारी सुरू केली होती. मनपाच्या एकूण 96 शाळा असून, त्यात 28,750 विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ते ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील, त्या दिवशी हे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
गणवेशासाठी पालिकेला शासनाकडून 86 लाख 25 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्या त्या शाळेला गणवेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानंतर शाळेचे जे बिल होईल, ते मनपा शिक्षण मंडळाकडून सुपूर्द केले जाणार आहे. मनपाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जाणार असून, त्याबाबतचे नियोजनही सुरू आहे. गणवेशासह विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांसाठी लवकरच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठकही घेतली जाणार आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. या साहित्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होत असतो. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत. दरम्यान, शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना दोन गणेवशाचे सेट देण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील गणवेश वाटप झाल्यानंतर दोन महिन्यांनी दुसर्‍या टप्प्यातील गणवेशही देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago