filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0;
मनपाच्या शाळा क्र. 14 व 15 मध्ये पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी. समवेत आयुक्तांचे स्वीय सचिव कैलास दराडे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, मुख्याध्यापिका जयश्री आथरे, प्रभारी मुख्याध्यापक विनायक मते, माजी मुख्याध्यापक बाजीराव झाडे आदी. (छायाचित्र : सुनील बुनगे)
पंचवटी : वार्ताहर
राज्याचे शिक्षणमंत्री जिल्ह्याचे असल्याने जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून, जास्तीत जास्त विद्यार्थांचा ओढा मनपा शाळेकडे व्हायला हवा, यासाठी शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केले.
मखमलाबाद येथील नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 14 व 15 येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारातून बैलगाडीतून स्वागत करण्यात आले.
त्या बैलगाडीचे सारथ्य मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी स्थायी समिती सदस्या तथा माजी नगरसेविका सुनीताताई पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पिंगळे, पत्रकार सुनील बुनगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापिका जयश्री आथरे, माजी मुख्याध्यापक बाजीराव झाडे, प्रभारी मुख्याध्यापक विनायक मते उपस्थित होते. किसन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. माहितीपुस्तिकेचे वाचन वृषाली आहिरे यांनी केले. पंकज पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी देवीदास महाजन, संगीता पाटील, प्रतिभा वाटपाडे कल्पना वाणी, सुरेखा कदम, अर्चना तिटकारे, संध्या सोनजे, राहुल चौधरी, प्रकाश बहिरम, पंकज पवार, शिवाजी ठाकरे, रोहिणी आहेर, वर्षा देवरे, प्रकाश बागूल, संगीता मौले, मनीषा राणे, वृषाली आहिरे, नामदेव चौरे आदी उपस्थित होते.
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…
प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…
एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…