कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी
तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल, तर खालील अॅक्सेसरी टच-अप्स ट्राय करून बघाच :
बॅग – केवळ गरज नव्हे, स्टाइल स्टेटमेंटही! : टोट बॅग, स्लिंग बॅग की बॅकपॅक? अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबत जर तुमच्या बॅगेत थोडं ‘स्वॅग’ असेल तर ती लूकमध्ये चारचाँद लावते. एखादी सॉलिड कलरची लेदर स्लिंग बॅग क्लासिक वाटते, तर प्रिंटेड कॅनव्हास बॅकपॅक तुमच्या व्हायब्रंट मूडला शोभा देते.
गॉगल्स – नजरेची नाही, लूकची गरज!
सूर्यप्रकाशापासून बचाव करताना तुम्ही रेट्रो राउंड गॉगल्स, कॅट आय शेड्स किंवा मिरर सनग्लासेस ट्राय करू शकता. हे गॉगल्स फक्त प्रोटेक्शन देत नाहीत, तर स्टाइलमध्ये मडोंट केअर वाइब्स भरतात.
हातातली घड्याळं – वेळ दाखवणारी अदा : बॉयफ्रेंड स्टाइल मेटल वॉच किंवा मिंमलिस्टिक स्मार्टवॉच – घड्याळ ही अॅक्सेसरी लूकमध्ये एलिगंट टच देते. वॉचसोबत अतिशय पातळ ब्रेसलेट घातल्यास हाताच्या हालचालींमध्ये एक नाजूक उठाव येतो.
हेडफोन्स – म्युझिकसह स्टाइलचा संगम : काही मुली मोठे ओव्हरइअर हेडफोन्स वापरतात – हे त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक भाग होऊन जातं. गुलाबी, पांढर्या किंवा मिंट ग्रीन हेडफोन्स क्युट लूक तयार करतात. कॉलेजच्या व्हायब्ससाठी योग्य.
मेकअपची अॅक्सेसरी टच – सॉफ्ट आणि स्टायलिश : कॅम्पस लूकसाठी तुम्ही मनो मेकअप मेकअप लूक ठेवू शकता – सॉफ्ट लिप टिंट, ब्राऊन आयलाइनर आणि नॅचरल शेड्सचा नेलपॉलिश हे टच-अप्स तुमचा फ्रेशनेस वाढवतात.
इअरिंग्स, रिंग्स आणि चोकर – पर्सनॅलिटी दाखवणार्या अॅक्सेसरीज : स्टड इअरिंग्स किंवा मीडियम लांबीचे डेंगलर्स हे कॅम्पससाठी योग्य ठरतात. चोकरमधून तुमच्या आउटफिटला ट्रेंडी अँगल मिळतो. सोनेरी किंवा ऑक्सिडाइज्ड मेटलमध्ये एक-दोन बोटींवर रिंग्स – हा सिंपल लूकही ऑन पॉइंट वाटतो.
स्कार्फ आणि दुपट्टा – फॅब्रिकचा फ्लेयर : सिंपल जीन्स-टी-शर्टवर एखादा कलरफुल स्कार्फ किंवा ट्रेंडिंग दुपट्टा टाकला, की लूकचं रूप पालटतं. हिवाळ्यात तर हे लूकसाठी आणि उबेसाठी दोन्ही उपयोगी ठरतं.
कॉम्बो क्रिएशन – एकत्रित सौंदर्य : टोट बॅग + गॉगल्स + मेटल वॉच + डेंगली इअरिंग्स = तुमचा कॅम्पस डे लूक रेडी! हे मिक्स अॅन्ड मॅच फॉर्म्युला वापरून तुम्ही दररोज नवा लूक ट्राय करू शकता.
टचअप
अॅक्सेसरीज म्हणजे केवळ शोभेची साधनं नव्हे, त्या तुमच्या मूड, आत्मविश्वास आणि दृष्टिकोनाचे प्रतीक असतात. बूट्स, बेल्ट्स, मिनिमल अॅक्सेसरीज, पिंक टोन, ब्लॅक मेटल – हे सगळं वापरणं म्हणजे एक स्वतःचं ब्रँडिंग आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…