नाशिक

फोन खणखणला… साहेब, घरात पाणी शिरले! लवकर लोक पाठवा!!

आपत्ती कक्षाकडे गंगापूर गावातून फोन; मदतीची मागणी,  भिंत कोसळण्यासह पंधरा झाडे पडली

नाशिक : प्रतिनिधी
साहेब, आमच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. आजुबाजुच्या परिसरातही पाणी आहे. लवकर तुम्ही मदत करा… शहरातील रविवार पेठ येथे आमच्या घराची भिंत कधीही कोसळू शकते. तत्काळ कार्यवाही करावी, यासह शहरातील विविध भागांत गुरुवारी (दि.19) रस्त्यावर, पार्किंगमध्ये, वीजवाहिन्यांवर झाडे उन्मळून पडली. यावेळी नागरिकांनी महापालिकेत 1 जूनला स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोनद्वारे मदतीची मागणी करत होते.
नाशिकमध्ये गुरुवारी (दि. 19) पावसाने जोरदार बॅटिंग करत शहराला चांगलेच झोडपून काढले. पहाटे साडेतीनपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी एकपर्यंत दमदार हजेरी लावली. परिणामी गोदावरीला हंगामातील व जूनमधील पहिलाच पूर आला. नऊ तासांत 60 मिलिमीटर पावसाची नोंद केली गेली. सराफ बाजारातील व्यावसायिकांची तारांबळ होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे दुकान अर्धवटच लावले गेल्याने यात आर्थिक नुकसान झाले. गंगापूर गावातील मुरीद मस्जिद भागातून नरेंद्र तहार यांनी महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षात फोन करून त्यांच्या घरात पाणी शिरल्याचे सांगून मदत करण्याची मागणी केली. हा परिसर सातपूर विभागात येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीय अधिकार्‍यांसह तेथील अधिकार्‍यांना माहिती दिली.
दुसर्‍या एका घटनेत रविवार पेठ येथील रहिवासी संतोष तानाजी मोरे यांनी त्यांच्या घराची भिंत कमकुवत झाल्याचे सांगून कार्यवाहीची मागणी केली. गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरमध्ये पिंगळे फार्म येथील सप्तरंग सोसायटी येथील मोहन पिंगळे यांच्या घरात गटारीचे पाणी शिरल्याची तक्रार करत उपाययोजनेची मागणी केली. घरात पाणी शिरण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पंधरा ठिकाणी झाडे पडल्याचेही फोन आले.
यात इंदिरानगरमधील सुकदेव शाळेमागे गोदावरी दर्शन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चारचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळले. दिंडोेरी रोडवरही रस्त्यात गुलमोहराचे झाड पडले. नाशिकरोडच्या सुभाष रोड परिसरात थेट वीजवाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली जाते. या माध्यमातून नागरिकांना मदत करून सुरक्षास्थळी
हलविले जाते.

’त्या’ दोनशे झोपडपट्ट्यांना भीती

सातपूर येथील आयटीआय पुलाजवळून जाणार्‍या नंदिनी नदीच्या प्रवाहाचे पाणी पात्राबाहेर येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेजारी असलेल्या दोनशे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे मनसेच्या निर्मला पवार यांनी आपत्ती कक्षात फोन करून कार्यवाहीची मागणी केली.

Editorial Team

Recent Posts

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

3 minutes ago

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

10 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

17 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

23 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

27 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

32 minutes ago