नवी दिल्ली :
डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी यशस्वी चाचण्या घेतल्या.
ओडिशाच्या किनार्यावर या चाचण्या घेण्यात आल्या. स्वदेशी क्विक रिअॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचण्यासाठी डीआरडीओच्या संपूर्ण टीमचे तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनांचे
अभिनंदन केले.
स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सक्षम होण्यास आणखी मदत होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. देशाच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेत स्वदेशी क्विक रिअॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र आहेत. या यंत्रणेच्या मदतीने शत्रूचे विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन आदी स्वरूपाचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे तसेच शत्रूवर आकाशातून प्रतिहल्ला करणे शक्य
होणार आहे.