महाराष्ट्र

बागलाण : अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सटाणा : प्रतिनिधी :
बागलाण तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वटार गावातील विंचुरे शिवारात घडली आहे. जिभाऊ नामदेव खैरनार (वय 45 ) असे या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी जिभाऊ खैरनार हे आपली पत्नी व मुलांसोबत शेतात राहत होते. त्यांची स्वतःची दिड एकर शेती होती.त्यांत कांदा काढणी होऊन एक ते दीड महिना उलटूनही समाधानकारक भाव मिळत नाही, भाव मिळतो तो फक्त 500 ते 600 सहाशे असा अल्प दर मिळत असल्यामुळे जवळ जवळ साडेचार ते पाच लाख कर्ज फेडायचे कसे ,त्यात जी जमीन आहे ती गहाण ठेवली आहे, दुसरे व्याजाचे व हातउसनवार घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवेवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत जिभाऊ खैरनार यांनी जीवन संपवले. शासकीय आरोग्य रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.शोकाकूल वातावरणात जिभाऊ खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सटाणा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

2 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

9 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

10 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

10 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

10 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

10 hours ago