नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहन करू पाहणारा युवक नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात…
नाशिक : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून भडगाव तालुक्यातील एका युवकांने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडलीये. दरम्यान नाशिकरोड पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला असून पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलंय. भूषण नामदेव पाटील (रा. कसबा ता. भडगाव जि. जळगांव) अस आत्मदहन करणाऱ्या युवकाचे नाव असून त्याने हे पाऊल का उचलले याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे
महसूल उपायुक्त रमेश काळे यांनी या तरुणांची कैफियत समजून घेतली असून त्याला न्याय देण्याचे आश्वासनही दिलंय. कदाचित अल्पवाधित त्याला न्यायही मिळेल पण अशा अनेक अन्यायग्रस्ताना नडणाऱ्या शासकीय प्रवृत्तीचं काय हा खरा प्रश्न आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago