नाशिक : वार्ताहर
जुने नाशिक भागातील पगडबंद लेन आंबेडकरवाडा येथील मागील बाजूला शनिवारी (दि.4) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली होती. स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे काही वेळात आग विझवण्यात यश मिळाले. दरम्यान, वाडा पडका व बंद असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या संपूर्ण परिसरात अनेक धोकादायक वाडे असून, सर्व वाडे रिकामे आहेत. घ.नं. 1468 पगडबंदलेन आंबेडकरवाडा मागे पडका वाडा आहे, त्या ठिकाणी लाकूड तसेच पालापाचोळा जमा झाला होता. अचानक त्याने पेट घेतला होता. लाकूड असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. स्थानिक तरुणांनी प्रयत्न केले तर महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. महापालिकेचा एक बंब व काही सेवकांनी प्रयत्न करून आग विझवली. फायरमॅन जगदीश देशमुख, तोसिफ शेख, किशोर बागूल, अनिल गांगुर्डे, गणेश गायधनी आदींनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. याबाबत पोलिसांनी नोंद घेतली आहे.
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…
बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…