ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

पराभव दिसू लागल्याने रडीचा डाव असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

सिडको : दिलीपराज सोनार

उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना एैन निवडणूकीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना उबाठा गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बडगुजर यांनी ही तडीपारीची नोटीस अद्याप पावेतो स्विकारली नसली तरी आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले
गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील अरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर सुटला होता यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख पदावर असलेले सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंग व्हायलर झाला होता त्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची चौकशी देखिल पोलिसांना केली होती दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते त्यावेळी उबाठा गटाकडुन खासदारकीची उमेदवारी डावलले म्हणून शिंदे गटात सहभागी झालेले विजय करंजकर यांनीदेखील आपले तिकीट कापण्यामध्ये सुधाकर बडगुजर यांनीच कटकारस्थान केल्याचा आरोपही करंजकर यांनी केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होत नाही तोच बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आली आहे
बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचे उबाठा गटाच्या शिवसैनिकांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केला आहे दरम्यान बडगुजर यांच्या घरी तडीपारीची नोटीस घेऊन गेलेल्या पोलिसांकडुन नोटीस स्विकारली नसली तरी याबाबत आपण वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले

महायुतीचे उमेदवार हेमतं गोडसे यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरून उबाठा गटाच्या सर्व पदाधिका-यांना नोटीसा पाठवतील असा आरोपही करत उबाठा गटासह सर्व शिवसैनिक आणि मतदारांनाही सत्ताधारी नोटीसां पाठवतील याचा काही नेम नाही
ज्ञृषी वर्मा
पदाधिकारी
शिवसेना उबाठा गट

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

19 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

26 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

32 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

38 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

43 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

58 minutes ago