साहित्य : कैरीचा किस, साखर, लवंग, दालचिनी, वेलची पावडर, तूप….
कृती : कढईत तूप घाला, कैरी किस व साखर घाला. लवंग, दालचिनीचे तुकडा टाका व परतत राहा… साखरेचा पाक होईपर्यंत नंतर कैरी पारदर्शक होईल व ते नंतर मिश्रण घट्ट होऊ लागेल. पळीने मिश्रणाचा गोळा पडला की गॅस बंद करा व गार झाल्यावर वेलची पावडर टाका. बरणीत भरा.
साखर आंबा दुसरा प्रकार..!
साहित्य : कैरीच्या 1 किलो बारीक फोडी, 1 किलो साखर, वेलची पूड 1 चमचा, 2 केशर काड्या.
कृती : प्रथम एका पातेल्यात कैरीच्या 1 किलो फोडी व अर्धा किलो साखर एकत्र करून रात्रभर ठेवून द्यावे. सकाळी त्याला पाणी सुटलेले असेल. त्यात किंचित मीठ घाला व हे सगळे मिश्रण एका डब्यात घालून कुकरमध्ये बुडाशी पाणी घाला व हा डबा त्यात ठेवून हलवून कुकरच्या 6 शिट्ट्या करून घ्या. गॅस बंद करून, डब्यातील शिजलेले मिश्रण गार होऊ द्या. नंतर एका कढईत अर्धा किलो साखरमध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालून 1 तारी पाक करून घ्या. नंतर यात कुकरमध्ये शिट्टी केलेलं कैरी साखरेचे मिश्रण घालून 20 ते 25 मिनिटे मोठ्या गॅसवर शिजवा…घट्ट होत आला की, गॅस बंद करा. नंतर यात वेलची पूड, केशर काड्या घालून साखर आंबा गार झाल्यावर बरणीत भरा…
Sugar Mango
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…