लासलगाव बाजार समिती : सरासरी 1900 रुपये प्रतिक्विंटल दर
लासलगाव : वार्ताहर
आशिया खंडातील कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता उन्हाळ कांद्याचा हंगाम संपला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक झालेली नाही. दुसरीकडे, लाल कांद्याची आवक मात्र वेगाने वाढू लागली असून, शनिवारी बाजारभावातही चढ-उतार पाहायला मिळाले.
लासलगाव बाजार समितीत शनिवारी (दि. 27) लाल कांद्याची एकूण 823 नगांची आवक झाली. यामध्ये 227 ट्रॅक्टर आणि 596 पिकअपमधून सुमारे 12 हजार 430 क्विंटल कांदा लिलावासाठी दाखल झाला होता. बाजारभावाचा विचार करता, लाल कांद्याला कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 2,511 रुपये, तर सरासरी 1,900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यंदा झालेल्या सतत पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले
आहे.
शेतकर्यांनी उन्हाळ कांदा चांगल्या भावाच्या आशेने चाळीत साठवून ठेवला होता; परंतु हवामानातील बदलामुळे साठवलेला कांदा खराब झाला. परिणामी, उन्हाळ कांद्याची आवक आता पूर्णपणे थांबली असून, बाजार समितीत केवळ लाल कांदा दाखल होत आहे.
Summer onion production declines; red onion arrivals increase सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…