द्वारका : वार्ताहर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या रविवारी नाशिकमध्ये येत असून , सकाळी ९ .३० वाजता भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन होणार आहे . सकाळी १०.०० वाजता शहरातील चार्टड अकाऊंटट व संघटनेतील पदाधिकारी यांच्यासोबत सी ए भवन , अशोका शाळा येथे बैठक घेऊन संवाद साधणार आहे . सकाळी ११.१५ वा गंगापूर रोड येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे यशस्विनी सामाजिक अभियानातील पदाधिकारी व महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . दुपारी ३.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे साहित्य क्षेत्रातील व पत्रकारिता महिलांशी संवाद साधणार आहे . सायंकाळी ६ वाजता मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथील कर्ता शेतकरी प्रकल्पास भेट देणार आहे . अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…