आस्वाद

सरते क्षण आणि नवीन पहाट

आयुष्य, ज्याला सुखाची सोनेरी किनार आणि दुःखाच्या थोड्या छटा… असं हे आपलं आयुष्य! जन्माला आल्यापासून प्रत्येकाची जी धावपळ चालू होते ते संपता संपत नाही. जन्म घेण्यासाठीसुद्धा धावपळच असते. बाळाचा जन्म,  त्याचे वेगवेगळे डोस, त्याचं दुखणं- खुपणं, शाळा, बालपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चढाओढ सगळं काही धावपळीमध्येच जातं. खूपदा ठरवतो मनात, की घेऊया थोडेसे विसाव्याचे क्षण… परंतु विसावा घेण्यासाठी ते क्षणच मुळी येत नाही.
मध्यंतरीच्या कालावधीत तर कोरोना नामक विध्वंसाने धुमाकूळ घातला होता. तेव्हा तर प्रत्येकाची फक्त एकच धावपळ चालू होती, फक्त जगण्याची!!
प्रत्येक जण धडपडत होता ते आपल्या आयुष्य वाचवण्यासाठी परमेश्वराने दिलेल्या ‘आयुष्य’ नामक या सुवर्णसंधीला कोणीही गमवू इच्छित नव्हता. किती ती धडपड आणि किती ती तडजोड…. असणारच म्हणा, कारण पुन्हा हे मानवी रूपी आयुष्य मिळेल न मिळेल?
आयुष्याच्या या खडतर प्रवासात, सगळेजण असे वळणावर आले होते की, प्रत्येकाचं लक्ष फक्त आणि फक्त जगणं एवढंच होतं. त्यावेळेस कोणतीच चढा -ओढ उरली  नव्हती. अशी काही वळणं आली की आयुष्य किती मोलाचे आहे हे अगदी व्यवस्थित समजते. काहींनी तर जन्म-मृत्यूच्या या प्रश्नाचे उत्तर पाप पुण्याच्या हिशेबाने लावला.
ज्याचे पुण्य जास्त त्याला आयुष्याची हमी आणि ज्याचे पाप जास्त, त्याला आयुष्य कमी.
निसर्गाने म्हणा किंवा परिस्थितीने,  दिलेली ही शिकवण आपण खरच कधी विसरायला नको आहे. प्रत्येकालाच प्रत्येकाचं पटतं असं नाही… परंतु आपल्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारणं… किंवा गुणांना वाव देऊन दोषांकडे दुर्लक्ष केलं तर खरंच प्रत्येक नातं खूप सुंदर होऊन जाईल.
वर्षाअखेर जेव्हा मागे वळून बघितलं तर आयुष्याचे कितीतरी रंग बघायला मिळतात. कधी आयुष्य अडचणींच्या दाट रंगांनी अगदी अंधारमय; तर कधी यश- सुख- संपदा याच्या तेजाने चमकणारे, कधी सगळे असून एकट्यासारखे तर कधी एकटे असूनही आनंदी असणारे असे क्षण!! सगळे क्षण सरत्या काळाची जाणीव करून देतात. दुःख असतातच  हो वाट्याला, त्याशिवाय सुखाचा आनंद कसा कळणार? याचाच अर्थ सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर दुःखाला कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाही. गत वर्षात काय छान झाले याच्या आठवणी नक्कीच जोपासाव्या पण गेलेल्या दुःखाची छोटीशी आठवण पण करू नये.
येणारे वर्ष, आपल्या आयुष्याची नवी पहाट… याकडे फक्त सकारात्मक दृष्टीनेच पाहायला हवं. मनात आत्मविश्वास, जिद्द, सकारात्मक असली की या नवीन पहाटेचा सूर्योदय, त्याच्या सोनेरी छटा आपल्या आयुष्यावर आनंदाचा समाधानाचा एक वेगळाच ठसा उमटवतील हे नक्कीच!!!
थोडेसे  मागे वळून बघताना, आयुष्याचा भूतकाळ आठवताना
झाला कधी त्रास तर
विसरून जा त्या क्षणाला…
नवीन वर्षाची नवीन पहाट
सुंदर क्षणाची पाऊलवाट,
दूर होतील सर्व निराशा..
सोनेरी आयुष्याची सोनेरी आशा

 

 

राखी खटोड

Ashvini Pande

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

2 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

4 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

22 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

22 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

22 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago