प्रतिमा

सुरळीची वडी खांडवी

1 वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ), 1 वाटी दही (2 वाट्या ताक), पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट (मिरची), किसलेला ओला नारळ, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा सफेद तीळ, 1 ग्लास पाणी, कोथिंबीर.
सुरळीची वडी / खांडवीची पाककृती
एका भांड्यात बेसन व दही (ताक) घेऊन व्यवस्थित ढवळून घ्या (गुठळ्या ठेवू नये). बेसन ताकाच्या मिश्रणात हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ (दही आंबट असल्यास चवीनुसार मीठ टाकावे) पाणी टाकावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे. आता मिश्रण तयार आहे. एका पातेल्यात किंवा पॅनमध्ये हे मिश्रण ओतावे. उकळी आल्यानंतर मंद आचेवर सतत ढवळत राहावे (गुठळ्या होऊ देऊ नये). मिश्रण तयार झाले का नाही हे ओळखण्यासाठी एका डिशच्या मागच्या बाजूला हे मिश्रण थोडेसे ओतून पसरावे व थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने सुरळी होते का ते बघावे. जर सुरळी होत असेल तर गॅस बंद करावा, अन्यथा मिश्रण ढवळत राहावे.साधारण 15 मिनिटांनंतर हे मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करावा.
एका ताटलीच्या मागच्या बाजूला तेल पसरून घ्यावे व त्यावर 2-3 चमचे मिश्रण टाकून उलथणीच्या सहाय्याने सर्वत्र पातळ पसरून घ्यावे.
साधारण 2 ताटांपुरते मिश्रण तयार होते.
दोन्ही ताटाला मिश्रण पसरल्यावर साधारण 5 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवावे. थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने भाग पाडावेत. भाग पाडल्यावर सुरीच्या सहाय्याने टोक उचलावे व बोटाने गोलगोल सुरळी करून घ्यावी. अशा प्रकारे सर्व सुरळीच्या वड्या करून घ्याव्यात; एका प्लेटमध्ये या वड्या किंवा खांडवी काढून घ्याव्यात.
आता एका फोडणीच्या भांड्यात दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर सफेद तीळ, कडीपत्ता टाकावा. तयार फोडणी सुरळीच्या वड्यांवर पसरावी; त्यावर किसलेला ओला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

Surlichi Vadi (Khandvi)

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago