प्रतिमा

भक्ती की दिखावा?

देव, धर्म आणि आपल्या वर्तनाचा आरसा

माणूस गरज संपली की देवालाही घरातून बाहेर आणून टाकतो.. नाही. अनेक ठिकाणी देवाचे फोटो, मूतीर्र् अतिशय वाईट परिस्थितीत, कुठल्यातरी महान भावनेने झाडाच्या बुंध्यापाशी, नदीच्या किनार्‍यांवर, मंदिरात कुठेही ठेवून दिलेल्या दिसतात आणि आपली जबाबदारी पार पडल्याच्या समाधानात माणसं जगतात.
गणपती उत्सव असो, नवरात्र असो, ही दृश्य बघताना हीच का आपली हिंदू संस्कृती हा प्रश्न पडतो.
वटपौर्णिमा झाली.
वृत्तपत्रापासून ते फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर वटपौर्णिमेचे महत्त्व वाचायला मिळाले. अनेक महिला पूजा करताना दिसल्या आणि प्रत्यक्षात दुसर्‍या दिवशी वटवृक्षाच्या आजूबाजूचे लज्जास्पद दृश्य बघितले आणि खूप वाईट वाटले.
याला काय म्हणावं भक्ती, ज्ञान, अज्ञान की स्वार्थ! अज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे, विज्ञान काय सांगत आहे, समजून घ्यायला वेळच नाहीये.
शिकून सवरून अज्ञानाच्या अंधारात भटकत आहोत.
येणारी पिढी नास्तिक आहे, असं आपण म्हणतो. त्याला कारण म्हणजे, त्यांना हा सगळा देवाशी चाललेला व्यवहारच दिसत आहे की! करोडोचे बिल पास करण्यासाठी पूजा घालायची, साकडं घालायचं, नंतर त्याच पैशांतून देणगी देऊन आपलं मंदिरातल्या बोर्डवर नाव लिहायचं. काय म्हणावं याला. गणपती बाप्पांसोबत उंदीरमामांची पूजा करायची आणि घरात उंदीर आला की त्याला मात्र हकलायचं किंवा मारायचं. अगदी असंच सापाचंही, नारायण नागबली, कालसर्प योगाची पूजा करताना सोन्याच्या नागाची पूजा करायची आणि नाग दिसला की त्याला ठेचून मारायचं. याच्यामागचं तत्त्व
काय असेल?
खरंतर नास्तिक म्हणजे, एखादी व्यक्ती, जी सर्व काही करत आहे, परंतु स्वतःच्या अस्तित्वालाच समजलेली नाहीये. नास्तिकचा अर्थ फक्त परमात्म्याला मानणे नाही, यासाठी खूप शिक्षण घेणे हा पण उद्देश नाहीये, उद्देश आहे आपलं मन परिपक्व करणे, उद्देश आहे सामाजिक कार्यामध्ये
स्वतःला सकारात्मक सक्रिय बनवणे, अभ्यासासोबत कार्यक्षमता पण
जरुरी आहे.
भाव समजून, परमात्म्यासमोर नतमस्तक होणारा, निर अहंकारी, चालत्या बोलत्या व्यक्तीसमोरही नतमस्तक होईल.
तर परमात्म्यासमोर नतमस्तक का व्हायचे? आपले सर्व दुःख, द्विधा त्याच्या चरणी सोपवून, त्याने दिलेल्या ज्ञानमार्गावर पवित्रपणे चाललो तर नक्कीच दुःख हरण होणार.
चालत्या बोलत्या व्यक्तीसमोर नतमस्तक होण्याचे ज्ञान तोच देतो.नतमस्तक झाला तर हार्मनी निर्माण होईल. हार मानली तर हार्मनी नक्कीच निर्माण होणार.
आदरणीय रवींद्र पाठक फार सुंदर सांगतात की, या व्रत-वैकल्य करणार्‍यांना विचारावं की, तुम्हाला राम हवाय की सुख हवंय? आणि बहुतांशी लोकांना राम (रामाने पाळलेली तत्त्व) नकोय. रामापासून मिळणारे सुख हवंय. इथे मग फसगत होते आणि आपणच येणार्‍या पिढीला बदनाम करतो. कारण त्यांच्यासमोर हा आदर्श आपणच निर्माण करत आहोत.
देवालाही वशिला लावून भ्रष्टाचार चालू आहे.
रामाच्याच मंदिरात चोरी! विचारही करवत नाही.
कुठलाही भ्रष्टाचार असो. भ्रष्टाचार केला की अधोगतीला सुरुवात होते हे विसरून चालणार नाही.
कुठे जात आहोत आपण?
परमार्थाची व्याख्याच बदलून टाकली आहे. चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, हेच कळेनासं
झालंय, नाही!
सुंदर वाक्य आहे, माझ्या घरात देवघर नाही, मी देवाच्या घरात राहतो, असं किती जणांना वाटत असेल.
चालत्या बोलत्या देवाची मनापासून सेवा करणं हीच खरी सेवा हे आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे.
आणि आता नेमकं आपण उलट करतोय.. नाही.
परमात्मा बोलत नाही, संकटातून दाखवून देतो, हे विसरून चालणार नाही. संकट आलं की, परमात्मा आठवतो. त्याचे सांगितलेले मार्ग मात्र सर्रास विसरतो.
अहो, आपण स्वतःच स्वतःला ओळखत नाही आहोत. आपल्याला एवढा वेळ आहे का? स्वतःचं मत विसरत चाललो आहोत.
सतत दुसर्‍यांवर लक्ष, दुसरा जे करेल ते मी करेल, बाह्य गोष्टींना महत्त्व.
मग आपणच म्हणतो, पूर्वीसारखं नाही राहिलं जग आता.
पूर्वीही वडीलधार्‍यांपासूनच शिकलो.
आताही नवीन पिढीला आपणच आदर्श आहोत.
ना फॉरेनसारखं जगतोय, ना भारतीय संस्कृती जपतोय. कोणी सोडवायचे हे प्रश्न? कोणीच आदर्श नाही समोर!

Devotion or a show?

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago