नाशिक

घर क्रमांक प्लेटसाठी गटविकास अधिकार्‍याच्या पत्राने आश्चर्य

एजन्सीमार्फत वसुली; पत्र परत घ्या, अन्यथा आंदोलन : चारोस्कर

दिंडोरी : प्रतिनिधी
ग्रामपंचायत हद्दीतील घरांना क्रमांक देणे आवश्यक असल्याच्या कारणावरून एका एजन्सीला तालुक्यातील प्रत्येक गावात पाठवून नागरिकांकडून त्या बदल्यात 50 रुपये वसुलीसाठी दिंडोरी गटविकास अधिकार्‍यांनीच पत्र काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गटविकास अधिकार्‍यांनी सक्तीचे पत्र काढताना मोबदल्याचाही बंदोबस्त त्यांनी स्वतःच करावा आणि तरतूद नसेल तर घरमालकांना त्यांच्या सोयीनुसार घर क्रमांकाचे प्लेट बसवण्यासाठी सांगावे, त्यासाठी ठराविक एजन्सीला घरापर्यंत पाठवून सक्ती करण्याचे पत्र गटविकास अधिकार्‍यांनी मागे घ्यावे, अन्यथा ग्रामीण जनतेवर लादत असलेल्या या सक्तीच्या प्रक्रियेवर आवाज उठवला जाईल, असा इशारा माजी आमदार रामदास चारोस्कर आदींनी दिला आहे. गटविकास अधिकार्‍यांनी सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायतींना पत्र काढले. त्यात नमूद ग्रामपंचायत क्षेत्रातील घरांची संख्या, जनगणना, कर आकारणी, बीपीएल, मतदारयादी, शिधापत्रिका तयार करणे आदी कामांसाठी गावपातळीवर ग्रामपंचायत हद्दीतील घरांना क्रमांक देणे आवश्यक आहे. यासाठी कृपाशंकर गुप्ता हे घर क्रमांकाचे नंबरप्लेट बनवून देण्याचे काम पन्नास रुपयांच्या मोबदल्यात करत आहेत. सदरच्या घर क्रमांकाच्या नंबरप्लेटवर कुटुंब कल्याण कार्यक्रम, लाडकी बहीण, एडस नियंत्रणाबाबत संदेश, बेटी बचाव, बेटी पढाव, हर घर शौचालय अशा शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धीस मदत होईल, अशा आशयाचे पत्र गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी काढले आहे. परंतु ही सक्ती कशासाठी? ठराविक व्यक्तींच्या एजन्सीकडूनच आम्ही का घ्यावे? संबंधित गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सदर दिलेले पत्र मागे घेत गावस्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा, अन्यथा आवाज उठवला जाईल व त्यास गटविकास अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराच माजी आमदार चारोस्कर, शिवसेना उबाठा पक्षाचे योगेश बर्डे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामराव हिरे, वसंत थेटे, विठ्ठलराव अपसुंदे, तुकाराम जोंधळे,राकेश शिंदे आदींनी दिला आहे.

विनाकारण एजन्सी नागरिकांच्या माथी
गटविकास अधिकार्‍यांनी फक्त सूचना कराव्यात आणि आवश्यक असल्यास गावस्तरावर कमी खर्चामध्ये जर कोणी काम करून देत असेल, तर त्यांच्याकडून घर नंबरचे प्लेट बनवण्याची परवानगी द्यावी. विनाकारण आपल्या हितसंबंधातून नागरिकांच्या माथी एखादी एजन्सी लावून त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्याचा प्रकार गटविकास अधिकार्‍यांनी करू नये, अशी मागणी होत आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago