नाशिक

नाशिक विभागातील एसटीच्या अकरा अधिकार्‍यांचे निलंबन

कामातील हलगर्जीपणा भोवला

नाशिक : प्रतिनिधी
कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील अकरा अधिकार्‍यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम श्रेणीतील तीन आणि द्वितीय श्रेणीतील आठ अशा अकरा अधिकार्‍यांना कामकाजातील हलगर्जीपणा भोवला. या कारवाईत दोन डेपो व्यवस्थापकांसह विविध विभागांतील नऊ अधिकार्‍यांचा समावेश आहे. वरिष्ठस्तरावरून एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या निलंबनामुळे विभागीय कार्यालयातचर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयातून माहिती तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी अशा दोन सदस्यीय समितीने नाशिक विभागीय कार्यालयाची तपासणी (इन्स्पेक्शन) केली होती. या तपासणीत विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी काही अधिकार्‍यांकडून कामात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले.
समितीच्या अहवालानंतर महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून संबंधित 11 अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. या अधिकार्‍यांना निलंबनाचे आदेश स्वीकारण्यास सांगण्यात आले असून, संबंधितांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यास ते पोस्टाद्वारे पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
या अधिकार्‍यांचे निलंबन
प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, नाशिकचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी नीलिमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भंडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे आणि आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे.

Suspension of eleven ST officials from the Nashik Division.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago