महाराष्ट्र

देशभरात पावसाचा धुमाकूळ

नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी
सध्या देशभरात मान्सूनचा जोर वाढत असून, 16 राज्यांत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. महाराष्ट्रात रेड अलर्ट स्थिती कायम आहे. गुरुवारी महाराष्ट्रातही मान्सूनचा जोर वाढला असून, मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज तर पालघरला मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने महामुंबई क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत होऊन रहदारीची कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकून पडल्याची स्थिती दिसत आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये 5 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेशसह 16 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार मुंबई-कोकण पट्टा आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर दाट ढगांचे आवरण असून, ते सक्रिय मान्सूनचे संकेत देत आहे. या संपूर्ण प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
शनिवार, 4 जुलै तसेच रविवार-सोमवार म्हणजे 5 आणि 6 जुलै रोजी उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या वापी ते चिपळूण या पट्ट्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी, 5 जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, नाशिक पट्ट्यातही हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी केला जाण्याची शक्यता सध्याच्या हवामान स्थितीवरून दिसत आहे.

मुंबईत मुसळधार

मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई व ठाणे जिल्ह्यांसाठी ’ऑरेंज अलर्ट’ तर पालघर जिल्ह्यासाठी अत्यंत सतर्कतेचा ’रेड अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिल्याने सखल भागांत जागोजागी पाणी साचल्याच्या तक्रारी आहेत. तसेच रेल्वे व लोकल उशिराने धावत होत्या.

 

Rains wreak havoc across the country.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago