निफाडला घरासमोरून स्विफ्ट कार

निफाड : तालुका प्रतिनिधी निफाड शहरातील गणेशनगर भागातील ठेकेदाराची घरासमोर उभी केलेली स्विफ्ट कार रात्रीच्या सुमारास काच फोडून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय शंकर महाजन (कॉन्ट्रॅक्टर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दैनंदिन वापरातील मारुती सुझुकी कंपनीची पांढर्‍या रंगाची स्विफ्ट (एमएच 15 डीएम 8643) कार 9 डिसेंबर रोजी रात्री घरासमोर पार्क केली होती. 10 डिसेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादींची पत्नी प्रमिला यांनी घराबाहेर पाहणी केली असता कार गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ फिर्यादींना माहिती दिली. फिर्यादी महाजन यांनी गाडी उभी केलेल्या ठिकाणी पाहणी केली असता कारची काच
फुटून खाली पडलेली दिसली. फिर्यादींचे भाऊ बबन महाजन, सुनील भाबड व रमेश सानप यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, कार मिळून न आल्याने चोरट्याने काच फोडून वाहन चोरी केल्याची खात्री झाली. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन सांगळे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *