आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन
चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील वडबारे येथील तांबटी पाझर तलाव सुमारे वर्षभरापूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते. या परिस्थितीची दखल घेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून तलावाच्या पुनर्बांधकामासाठी एक कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करून आणला.
या कामाची दर्जेदार पूर्तता झाल्यानंतर गुरुवारी आमदार डॉ. आहेर यांच्या हस्ते तलावाचे लोकार्पण व जलपूजन पार पडले.
तलावाच्या पुनर्बांधकामामुळे वडबारेसह परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटणार असून, भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुधारेल.
“विकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. वडबारेच्या शेतकर्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्याचा शब्द दिला होता, तो आज पूर्ण केला,“ असे प्रतिपादन आमदार डॉ. आहेर यांनी केले.
विरोधक केवळ टीका करत असताना आपण प्रत्यक्ष विकासकामांतून जनतेचा विश्वास संपादन करत असल्याचेही ते म्हणाले.
तलावाच्या पुनर्बांधकामामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार डॉ. आहेर यांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी माजी सभापती प्रशांत देवरे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल, पंढरीनाथ खताळ, निवृत्ती शिंदे, योगेश ढोमसे, राजेंद्र पाटील, डॉ. भावराव देवरे, महेंद्र गांधी, भिका जाधव, सोपान आहेर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tambati Lake gets a new lease of life with an outlay of ₹1.5 crore.