मनमाड : आमिन शेख
मृत्यू कुठे आणि कसा येईल याचा नेम नाही अशीच एक आगळीवेगळी घटना मनमाड शहरात जळगाव-चांदवड महामार्गांवर घडली असून मनमाड येथे इंधन टँकर चालविताना चालकाला हृदय विकाराचा जबर धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत्यू झाल्यानतर धावत्या टँकरने अगोदर ट्रक्टरला धडक दिली व त्यानंतर डीव्हायडरवर जाऊन आदळल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे हा सर्व प्रकार मनमाड मध्ये घडला असुन या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मनमाड येथे इंधन टँकर चालविताना चालकाला हृदय विकाराचा जबर धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.मृत्यू झाल्यानतर धावत्या टँकरने अगोदर ट्रक्टरला धडक दिल्यामुळे दोन महिलासह तीन जण जखमी झाले त्यानंतर टँकर डीव्हायडरवर आदळून थांबला.जर टँकर डिव्हायडरवर आदळला नसता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती मात्र सुदैवाने टँकर डिव्हायडरवर आदळून थांबल्यामुळे पुढील अनर्थ टळला,अपघातात जखमी झालेल्या तिघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नाना जगताप असे हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे जर हा टॅंकर डिव्हायडरवर आदळला नसता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती मात्र सुदैवाने तसे घडले नाही मात्र टॅंकर चालकांनी देखील आपली काळजी घेतली पाहिजे मुळात इंधन कंपनीच्या वतींने या सर्व चालकांचे व सोबत असणाऱ्या वाहकांचे वेळोवेळी मेडिकल चेकअप व अशा येणाऱ्या इमर्जन्सी मध्ये काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात आशा घटनाना आळा बसू शकतो.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…