नाशिक

अतिरिक्त सूट देऊनही करदात्यांचा असहकार

गतवर्षी एवढीच करवसुली

नाशिक : प्रतिनिधी
थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने नियमित करदात्यांना एप्रिलप्रमाणेच मे महिन्यातही आठ टक्के करसवलत दिली. मात्र, महापालिकेने अतिरिक्त तीन टक्के करसवलत देऊनही करदात्यांनी असहकार केल्याचे चित्र आहेे. मे 24 मध्ये करावर पाच टक्के सवलत असताना, 59 हजार 381 मिळकतधारकांनी 26 कोटी 89 लाख 12 हजार 792 भरणा केला. यंदा मात्र पाचऐवजी थेट आठ टक्के करसवलत देण्यात आली. मात्र, मे महिन्यात 60 हजार 915 करदात्यांनी 28 कोटी 35 लाख 51 हजार 841 इतकाच कर भरला. गतवर्षीपेक्षा अवघी एक कोटी 46 लाख 39 हजार 49 लाखांच अतिरिक्त कर पालिकेत जमा झाला.

कर विभागाला 245 कोटींचे सुधारित घरपट्टी वसुलीसाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेवर पाचशे कोटींचा थकबाकीचा डोंगर आहे. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेच्या करसंकलनकडून मागील वर्षापासून अभय योजना, शास्तीमध्ये 93 टक्के सूट सवलत योजना राबवली जात आहे. करसंकलन विभागाने थकबाकीचा डोंगर खाली करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु करदात्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. नाशिक महापालिकेला जीएसटी अनुदानाखालोखाल घरपट्टीतून मिळणारा महसूल उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. घरपट्टी वसुलीसाठी मनुष्यबळाचा अभाव आणि देयक वाटपातील संथ गतीमुळे घरपट्टीच्या चालू मागणीसह थकबाकीचा आकडा सुमारे साडे पाचशे कोटींपर्यंत गेला आहे. घरपट्टीच्या नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने कर सवलत योजना राबवली. मात्र, अद्यापही 72 बड्या थकबाकीदारांकडे कोटींच्या घरात थकबाकी आहे. दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी कठोर पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात सहाही विभागांतील प्रत्येकी 200 बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे निर्देश विभागीय अधिकार्‍यांना दिले होते. तर 412 बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आलत. कर भरण्यकडे पाठ फिरवणार्‍यांच्या सातबार्‍यावर पालिकेच्या नावाची नोंद होणार असून, थकबाकीचा बोजाही चढविला जाणार आहे.

चालू महिन्यात पाच टक्के करसवलत असणार आहे. एप्रिल व मे महिन्यात आठ टक्के करसवलत होती. थकबाकीदारांनी कर सवलतीचा फायदा घेऊन पालिकेला सहकार्य करावे. थकबाकी न भरणार्‍यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल.
– अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

शहरात 5 लाख 56 हजार 693 मिळकतदार

महापालिकेसमोर पाचशे कोटी थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे. करसवलतीची संधी देऊनही पालिकेला केराची टोपली दाखवणार्‍यांची यादी करसंकलनने तयारी करून ठेवली असून, संबंधितांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू असल्याचे कर संकलन विभागाने म्हटले आहे. शहरात एकूण 5 लाख 56 हजार 693 मिळकतदार आहेत.

             

Gavkari Admin

Recent Posts

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…

1 day ago

मालेगाव शहरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…

2 days ago

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…

2 days ago

डॉ. नीलम रहाळकर यांचे उद्या ‘अरंगेत्रम्’; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…

2 days ago

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ

कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…

3 days ago

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

3 days ago