नाशिक

करदात्यांनी पालिकेच्या झोळीत टाकले 74 कोटी

जूनमध्ये पाच टक्केच सवलत

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे नियमित करदात्यांसाठी एप्रिल ते जून अशी तीन महिन्यांसाठी सवलत योजना लागू केली आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, एप्रिलबरोबरच मे महिन्यातही आठ टक्के करसवलत कर संकलन विभागाने लागू केली. दरम्यान, या दोन महिन्यांत 1 लाख 69 हजार 893 करदात्यांनी 74 कोटी पालिकेच्या झोळीत टाकले.
महापालिका करसंकलन विभागाला सवलत योजना पावल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये 40 कोटींची वसुली असता, ती मेच्या 30 तारखेपर्यंत 74 कोटींपर्यंत गेली आहे. एप्रिल व मे महिन्यात मालमत्ता करावर एकूण रकमेवर आठ टक्के व ऑनलाइन भरणा केल्यास दोन टक्के असे एकूण दहा टक्के पालिकेने सवलत दिली आहे.तर जूनमध्ये मात्र, पाच टक्केच सवलत मिळणार आहे. या करसवलतीचा लाभ उठवण्यासाठी करदात्यांनी ऑफलाइनसह ऑनलाइनला प्राधान्य देत कर भरला आहे. दरम्यान, गतवेळी सवलत योजना मनपाला चांगली पावली होती. तीन महिन्यांत तब्बल 120 कोटींचा भरणा नागरिकांनी करत आर्थिक सूट पदरात पाडली. यंदाही सवलत योजनेचा प्रारंभ दणक्यात झाला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रेकॉर्डब्रेक मालमत्ता कर वसूल होण्याची चिन्हे आहेत.

पालिका प्रशासनाने नियमित करदात्यांसाठी एप्रिलपासून सवलत योजना सुरू केली आहे. आठ टक्के करसवलत घेण्यासाठी शनिवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नागरिकांनी करसवलतीचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
-अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा

गतवर्षीपेक्षा दहा कोटींची पिछाडी

महापालिकेने गेल्या वर्षी राबवलेल्या करसवलत योजनेला करदात्यांनी प्रचंड प्रतिसाद देत

एप्रिल व मे या दोन महिन्यांत 85 कोटींचा भरणा केला. यंदा मात्र दोन महिन्यांत 74 कोटी रुपये

मालमत्ताधारकांनी भरले. परंतु, गतवर्षीपेक्षा यंदा दहा कोटींच्या वसुलीत घट झाल्याचे दिसून आले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago