नाशिक

युवा शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नळवाडपाडा येथील हृदयद्रावक घटना

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराच्या छतास लोखंडी पाइपला शिकार पंप बांधण्यास गेलेला युवा शेतकरी त्या पाइपमध्ये वीजप्रवाह उतरल्याने चिकटला. त्यास वाचविण्यास गेलेल्या पत्नीसही विजेचा धक्का बसला. युवा शेतकरी दाम्पत्य मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले (वय 29) हे वस्तीवर राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असून, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या पावसावेळी ते आपल्या घराचे पडवीच्या छताच्या लोखंडी पाइपला शिकार पंप बांधण्यास गेले. संबंधित पाइपमध्ये वीजप्रवाह उतरलेला होता. त्या विजेचा धक्का त्यास बसला, हे बघताच त्यांची पत्नी राणी (वय 25) ही त्यांना वाचवण्यास गेली. तिलाही विजेचा शॉक बसला. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्याने विजेचा तीव्र शॉक बसत त्यांना वाचण्याची संधी मिळाली नाही. सदर महिला सात महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. युवा दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन मुलगी, असा परिवार आहे.

पप्पा-मम्मी कधी येणार?

या घटनेनंतर दोघांनाही दिंडोरी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी चिमुकल्यांना सांगितले की, पप्पा,मम्मी दिंडोरीला गेले, येतील. शुक्रवारी पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, वीज कर्मचारी आले त्यावेळी चिमुकल्यांना वाटले आपले पप्पा- मम्मी आले. पण त्या गाडीत ते दिसले नाहीत. चिमुकल्यांनी आजीला विचारले पप्पा-मम्मी कधी येणार, हे ऐकताच सर्वांना गहिवरून येत सर्वांचेच डोळे पाणावले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago