नाशिक

रेल्वे गाड्यांच्या संचालनात तात्पुरते बदल

इगतपुरी-भुसावळ, देवळाली-भुसावळ मेमू रद्द

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या इगतपुरी-भुसावळ दरम्यान भादली ते जळगांव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकाच्या यार्ड पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी जोडणी उपलब्ध करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्यांच्या संचालनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
इगतपुरी-भुसावळ मेमू 12 ऑगस्टला इगतपुरी येथून आणि भुसावळ-इगतपुरी मेमू भुसावळ येथून रद्द. देवळाली-भुसावळ मेमू देवळाली येथून तर भुसावळ-देवळाली ही भुसावळ येथून रद्द करण्यात आली आहे. नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर 12 ऑगस्टला नंदुरबार येथून तर भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर भुसावळ येथून रद्द केली आहे . याच दिवशी नाशिक रोड-बडनेरा विशेष गाडी नाशिक रोड येथून आणि बडनेरा-नाशिक रोड विशेष गाडी बडनेरा येथून रद्द केली आहे.
सूरत-भुसावळ एक्स्प्रेस 11 ऑगस्टला सुरत येथून आणि भुसावळ-सुरत एक्स्प्रेस 14 ऑगस्टला भुसावळ येथून रद्द.दादर-भुसावळ विशेष गाडी 12 ऑगस्टला दादर येथून आणि भुसावळ-दादर विशेष गाडी भुसावळ येथून रद्द केली आहे. याच दिवशी भुसावळ-कटनी एक्स्प्रेस भुसावळ येथून रद्द करण्यात आली आहे. कटनी-भुसावळ 14 ऑगस्टला कटनी येथून रद्द करण्यात आली आहे.
मार्ग परिवर्तन करून चालविण्यात येणार्‍या गाड्या-
हिसार-हैदराबाद एक्स्प्रेस 11 ऑगस्टला हिसार येथून सुटणारी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन) -अकोला -पूर्णा मार्गे वळविण्यात येईल. अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस 11 ऑगस्टला अमृतसर येथून सुटणारी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन) -अकोला-पूर्णा मार्गे वळविण्यात येईल.तर 12 ऑगस्टला बंगळुरू- नवी दिल्ली एक्स्प्रेस मनमाड-जळगाव खंड दरम्यान दीड तास तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस मनमाड-जळगाव खंड दरम्यान पावणे दोन तास नियमन केली जाईल. यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मनमाड-जळगाव खंड दरम्यान दीड तास तर
मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस मनमाड-जळगाव खंड दरम्यान दीड तास नियमन करण्यात येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस मनमाड-जळगाव खंड दरम्यान एक तास, अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा – भुसावळ खंड दरम्यान तर गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा-भुसावळ खंड दरम्यान पावणे दोन तास नियमन करण्यात येईल.
जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा-भुसावळ खंड दरम्यान दीड तास, गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस अकोला -भुसावळ खंड दरम्यान सव्वा तास, बनारस -हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस खंडवा-भुसावळ खंड दरम्यान तीन तास, एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस खंड दरम्यान अकोला – जळगाव दोन तास नियमन केली जाईल. हडपसर-बनारस एक्सप्रेस 12 ऑगस्टला हडपसर येथून आठ एवजी सव्वा दहाला सुटेल.
या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास, गाड्यांची वक्तशीरपणा सुधारण्यास तसेच सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे संचालनास मोठी मदत होणार आहे.

 

 

Temporary changes in train operations

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago