नाशिक

जागतिक निर्यात केंद्रासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : निर्यात जनजागृती शिबिर

नाशिक : प्रतिनिधी
जागतिक दर्जाचे उत्पादन व निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योगांनी मागणी आधारित उत्पादन, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, नावीन्य, क्षमता विकास आणि जागतिक बाजारपेठेचा सखोल अभ्यास यावर भर द्यावा. ’लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेतून नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उद्योग, शासन, वित्तीय संस्था आणि सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा प्रशासन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंबड एमआयडीसी येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये आयोजित ’निर्यात जनजागृती शिबिर व ई-कॉमर्स एक्स्पोर्ट समिट’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डीजीएफटीचे अतिरिक्त महासंचालक आर. के. मिश्रा, उपमहासंचालक अश्वीन गोलपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, केपीएमजीचे प्रीतम मोहन सिंग, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योजक आणि निर्यातदार उपस्थित होते. उद्योगांनी उत्पादन क्षमतेसोबतच बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून उत्पादनाची दिशा निश्चित करावी. ’मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्थानिक कच्च्या मालाचा वापर, मूल्यवर्धन, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्रे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन यावर भर देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. उद्योगांना आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे, व्यवसाय सुलभता आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक ड्राय पोर्टचा प्रभावी वापर करून निर्यात खर्च कमी करणे, दळणवळण सुविधा सक्षम करणे आणि जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ’बायर-सेलर मीट’ आयोजित करून उद्योजकांना नव्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

निर्यातदारांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
आयईसी नोंदणी व एफटीपी-2023ची माहिती
ईसीजीसीची निर्यात पतविमा योजना
एक्सिम बँक, लिड बँक, नाबार्ड, एसआयडीबीआयच्या योजना
पेडामार्फत कृषी व प्रक्रिया उद्योगातील निर्यातीच्या संधी
इंडिया पोस्ट, ऊकङ, थरश्रारीीं व ऋशवएु यांचे ई-कॉमर्स निर्यातीवरील मार्गदर्शन

’बायर-सेलर मीट’चे आयोजन होणार

जिल्हा प्रशासन आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ’बायर-सेलर मीट’ आयोजित करण्यात येणार असून, त्याद्वारे नाशिकमधील उद्योजकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशिक्षण, तंत्रज्ञान, निर्यात वित्त, बँकिंग सुविधा आणि कर विषयक मार्गदर्शनाद्वारे उद्योगांची निर्यात क्षमता वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

Need for collective efforts for a global export hub

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

12 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

12 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

12 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

12 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

12 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

12 hours ago