महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच
नाशिक : प्रतिनिधी
संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या स्वीकृत नगरसेवकांची अखेर शुक्रवारी (दि.20) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दहा सदस्यांच्या नावाची घोषणा केली. भाजप सातव्या जागेसाठी काही धक्कातंत्राचा वापर करणार का? अशी चर्चा शुक्रवारपर्यत होती. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या दोन्ही नावांसह भाजपच्या सहा व शिंदेसेनेच्या दोन स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करत यावर पडदा टाकला. नवनिर्वाचित सदस्यांचा महापौर व आयुक्तांच्या हस्ते सत्कार करत अभिनंदन करण्यात आले
महापालिकेची शुक्रवारी (दि.20) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, नगरसचिव संजय नेरकर आदीसह उपस्थित होते. महासभा सुरु होताच विषयांना मंजुरी देऊन महापौरांनी भाजपच्या सहा, शिंदेसेना व ठाकरे गटच्या दोन्ही याप्रमाणे दहा स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा करत त्यांची नियुक्ती केली. यात भाजपचे रामहरी संभेराव, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, संदीप लेणकर, अजित चव्हाण, शिंदेसेनेचे बाबुराव आढाव, राजू लवटे व ठाकरे गटाचे हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा केली. दरम्यान ठाकरे गटावर नाराज होऊन काँग्रेस नगरसेवक सुफी जीन थेट भाजपला मिळाले होते. या राजकीय स्थितीचा फायदा उठवत सातव्या जागेवर हात मारता येतो का? यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी सुनील आडके यांच्या नावाचा अर्ज टपालाद्वारे दाखल करण्यात आला होता. ठाकरे सेना व कॉग्रेसची एकत्रित गटनोंदणी होऊन शहर विकास आघाडीची स्थापना होऊन या आघाडीचे केशव पोरजे यांची नियुक्ती फेब्रुवारीमध्येच झाली होती. पोरजे यांनी स्वीकृतसाठी हेमंतकुमार गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांचे नामनिर्देशन दिले होते. अर्ज छाननीत सुनील आडके यांचा अर्ज फेर्टाळ्ल्याने ठाकरे सेनेच्या पदरात दुसरी जागा पडली. अर्ज छाननी झाली. त्याचवेळी ठाकरे गटाच्या दोन्ही नावांवर मोहर पडली होती. परंतु तरीही ठाकरे गटाच्या दोन पैकी एका जागेवर महासभेत अखेरच्या क्षणापर्यत चलबिचल सुरु होती. मात्र महापौर आडके यांनी भाजप व शिंदेसेनेच्या स्वीकृत सदस्यांबरोबर ठाकरे गटाच्या दोन्ही गायकवाडांचे नावे घेतल्याचे सुटकेचा श्वास पदाधिकार्यांनी टाकला. या निवडीची घोषणा होताच नगरसेवकांसह प्रेक्षक गॅलरीतील समर्थकांनी टाळ्या वाजवत नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले.
पक्षनिहायनुसार नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य
भाजप – रामहरी संभेराव, हेमंत धात्रक, रोहिणी नायडू, चंद्रशेखर पंचाक्षरी, संदीप लेणकर, अजित चव्हाण
शिंदेसेना – बाबुराव आढाव, राजू लवटे
ठाकरे गट- हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड
त्या भीतीन भाजपची माघार
स्वीकृतची जागा मिळ्वण्यासाठी चक्क कॉग्रेसच्या नगरसेवकाला सोबत घेऊन ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या स्थानिक भाजपवर चौफेर टीका झाली असती. भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या कॉग्रससोबत गेल्याचा शिक्का बसण्याची भीती अस्ल्याचे पाहून अखेरच्या क्षणी भाजपने माघार घेतल्याचे बोलले जातेय. तसेच या विचित्र समिकरणासाठी पुढाकार घेणार्यांच्या प्रदेशस्तरावरुन चांगलीच खरडपट्टी काढल्याचीही चर्चा आहे.
समर्थकांचा जल्लोष
स्वीकृतची नियुक्ती करताच नगरसेवकांच्या समर्थकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोष केला. भाजप, शिंदेसेना व ठाकरे गटाच्या समर्थकांनी ढोलताश्या वाजवत आनोंदोत्सव साजरी केला.
पोलिसांचा बंदोबस्थ
स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची प्रर्किया महासभेत होणार असल्याने यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्थ ठेवला होता. विशेष म्हणजे सभागृहात गोपनीय शाखेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. परंतु नियुक्ती प्रकिया शांततेत व सुरळीत पडल्याने पोलीस प्रशासनाला दिलासा मिळाला.
दोन्ही जागा आम्हालाच मिळ्णार होत्या, गटनेता म्हणून तसे आपल्याला अधिकार असतानाही आम्हाल दुसरी जागा मिळू नये याकरिता प्रयत्न झाले. मात्र कायदयापेक्षा कोणीही मोठे नसल्याने स्वीकृतपदी हेमंतकुमार गायकवाड व बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती झाली असून येत्या दिवसांत शिवसेना अधिक आक्रमकपणाने महासभेत बाजू मांडताना दिसेल.
– केशव पोरजे, गटनेते, ठाकरे गटशिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकरयांची वर्णी लागली आहे. नाशिकरोड असेल किंवा जेलरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो पुन्हा एकदा शिवसेनेकडे आला असून या विभागात पक्षाची ताकद वाढली आहे.
– अजय बोरस्ते, गटनेते,शिंदेसेना,पक्ष नेतृत्वाने दिलेल्या नावाप्रमाणे या नियुक्त्या करण्यात आल्या असून सहाही जन विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असल्याने याचा आगामी सिंहस्थासाठी नक्कीच फायदा होइल. शिवाय हे सर्वजण पक्षाचे एकनिष्ट पदाधिकारी आहेत.
– अॅड. श्याम बडोदे, गटनेते, भाजप