माजी नगरसेवकांची संयमाची भूमिका
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरात दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता. मात्र, उत्सवाच्या दोनच दिवसांनंतर मुकेश शहाणे यांच्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तींनी शेणफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांमध्ये संतापाची भावना दिसून आली.
घटनेनंतर काही काळ परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, माजी नगरसेवकांनी संयम बाळगत आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून अंबड पोलीस ठाण्यात यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलीस तपास करत असून, ही कृती नेमकी कुणी आणि का केली, हे अजून स्पष्ट झालेले नाही.घटनेबाबत प्रतिक्रिया देताना काही स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अशा कृतींमुळे सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होते. पोलीस प्रशासनाने तत्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
दरम्यान, माजी नगरसेवकांनी संयम पाळल्याने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.राजकीय क्षेत्रात संयमाचे एक सकारात्मक उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात नाशिक ः प्रतिनिधी जहाँ डाल डाल पे…
राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…
इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…
यांत्रिकीकरणामुळे मशागत खर्चात वाढ, सोसायटीतून कर्जपुरवठा करावा अस्वली स्टेशन : प्रतिनिधी भाताचे आगार समजल्या जाणार्या…
सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सिन्नर ः प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव येथे घराच्या बंद दरवाजाची कडी उघडून…
दिंडोरी तालुक्यातील शेतकर्यांवर संकट : कांदा पिकाचे नुकसान दिंडोरी : प्रतिनिधी एप्रिल आणि मे महिन्यांत…