पंचवटी: प्रतिनिधी
पंचवटीत पहाटे च्या सुमारास होंडा सिटी कार चा भीषण अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना घडली, या कारचा वेग इतका होता की अपघातग्रस्त कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
पंचवटी परिसरातील अमरधाम जवळ रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास होंडा सिटी ( एम एच ०१ बी यू ३११२ ) या वाहनाचा भीषण अपघात झाला असून या वाहनातील एक जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.तर इतर तीन जण जखमी झाले. या वाहनाचा अपघात इतका भीषण होता की गाडी पूर्ण चक्काचूर झाली आहे.