मानोरी खुर्द शिवारात मादी बिबट्याची दहशत

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील कैलास शेळके यांच्या गट क्रमांक 129 मधील शेतात एका मादी बिबट्याने बछड्यांसह ठाण मांडल्याचे समोर आले. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वन विभागाच्या मदतीने तीनपैकी दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
कैलास शेळके यांच्या शेतात पिकाची कामे सुरू असताना बिबट्या दिसला. मादी बिबट्या तीन बछड्यांसह परिसरात वावरत असल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. बिबट्या मादी आक्रमक पवित्र्यात असल्याने शेतमजुरांमध्ये आणि परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मादी बिबट्या पिकाच्या दाट आडोशाचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र, तीन बछडे तेथेच अडकले होते. ग्रामस्थांनी शिताफीने आणि एकजुटीने शोध घेत तीनपैकी दोन बछड्यांना पकडून जेरबंद केले.
या घटनेची माहिती कळताच येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, निफाडचे आधुनिक पथक सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बछडे हाती लागले असले तरी तिसरा बछडा आणि मुख्य म्हणजे मादी बिबट्या अद्याप परिसरातच दडून बसलेली आहे. मादी बिबट्या बिथरलेली असल्याने ती अधिक हिंसक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, ड्रोनच्या सहाय्याने पिकांच्या शेतात मादीचा शोध घेतला जात आहे.

Terror of female leopard in Manori Khurd Shivara

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

6 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

7 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

7 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

7 hours ago